Tags: bhajaniche thalipeeth, bhajniche thalipith recipe in marathi, multigrain flour, multi-grain roti, bhajni che dhapate, थालीपीठ थालिपीट थालपीठ थालपीट
Bhajaniche thalipith |
वेगवेगळ्या प्रकारची भाजकी धान्ये यात वापरली गेली आहेत. त्यामुळे भाजणीचे थालीपीठ अतिशय पौष्टिक आहार आहे. लोणी किंवा दह्यासारख्या स्निग्ध पदार्थाबरोबर थालीपीठ खाल्ले जाते. त्यामुळे रुक्षपणा जाणवत नाही.
भाजणीचे थालीपीठ कसे करावे ते इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
Bhajani che Thalipith recipe in English, Multi-grain roti
भाजणीचे थालीपीठ साहित्य :
थालीपीठाची भाजणी (२ वाट्यात ३ मध्यम थालीपीठे होतात.)तिखट,मीठ, हिंग, हळद, तीळ, कोथिंबीर, कांदा/कोबी
भाजणीच्या थालीपीठाची कृती:
- मोठ्या वाडग्यात भाजणीचं पीठ घेऊन त्यात तिखट,मीठ, हिंग, हळद, तीळ, ओवा घालावे.
- कांदा उभा बारीक चिरावा. कांदा नसेल तर कोबीही उभी बारीक चिरून घातलेली चालते.
- कांदा /कोबी पिठात घालावी. पाणी घालून भिजवावे. एकदम पाणी घालू नये.
- पोळ्यांच्या कणकेपेक्षा जास्त पाणी लागत कारण भाजकी धान्ये पाणी शोषून घेतात.
- प्लास्टिक पेपरवर पिठाचा एक गोळा घेऊन हातानेच गोल गोल थापावे.
- हाताला सहसा चिकटत नाही. अगदीच चिकटल्यास थेंबभर तेल लावावं.
- वरून तीळ पेरावेत.
- नॉनस्टिक ताव गरम करून अगदी किंचित तेल लावावे. व त्यावर थालीपीठ टाकावे.
- चमच्याने ३-४ टोचे द्यावेत. तव्याला तेल लावताना मी अर्ध्या कांद्याला तेल लावून तोच तव्यावरून फिरवते.
- झाकण ठेऊन शिजू द्यावे. साधारण ४० सेकंदात एक बाजू भाजली जाते.
- झाकण काढून उलटावे. झाकण न ठेवता भाजावे. झालं तयार.
लोणी, दही, किंवा ओली चटणी सोबत खायला द्यावे.
English version of the recipe is available at Bhajani che Thalipith recipe in English, Multi-grain roti
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.