Beetroot Raita Beetroot Salad Beetroot Koshimbir recipe in marathi
रक्तवर्धक बीट वाढलेल्या ताटाला किती सुंदर बनवते! बीट कच्च खाता येतं. किंचित उकडून गोल चकत्या मीठ खाता येतात. सँडविचेसमध्ये, डाएट सॅलडमध्ये घालता येतं. खिचडीला किती मस्त रंग येतो बीटामुळे!अजून कुठे कुठे बीट वापरता येते त्याचा अंदाज घेण्यासाठी लिंकवरचे पेज वाचा.
इथे मी बीटाची कोशिंबीर सांगत आहे. अतिशय सोपी आहे. ही दोन प्रकारे करता येते.
दही घालून किंवा लिंबू पिळून. पोस्टच्या शेवटी दोन्ही फोटो दिले आहेत.
बीटाच्या कोशिंबिरीचे साहित्य:
२ नग बीटदही किंवा लिंबू
तूप जिरे हिंग - फोडणीसाठी
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
आवडत असल्यास लसूण पाकळ्या
बीटाची कोशिंबीर रेसिपी कृती:
बीट स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडावे. साले काढून किसणीने किसावे.कढल्यात तूप, जिरे, हिंगाची फोडणी करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत.
फोडणीत लसूण घालायचा असेल तर मात्र तेल - मोहरी - जिरे- हिंगाची फोडणी करावी. हळद नको.
ही फोडणी उकडून किसलेल्या बिटावर ओतावी. मीठ घालावे आणि नीट एकत्र करावे.
दही घालायचे नसेल तर या कोशिंबिरीवर अर्धे लिंबू पिळावे. नाहीतर लिंबाऐवजी दही घालावे.
डार्क पिंक शेडसाठी कमी दही आणि लाईट पिंकसाठी खूप दही :)
दह्यामुळे या कोशिंबीरीला खूप सुंदर गुलाबी रंग येतो.
Beet Curd Raita |
Beetroot Raita |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.