Tags: Mix veggies salad for dieting recipe in marathi, diet food, salad, 

साहित्य:

१०० ग्रॅ  मोड आलेली चवळी 
गाजर, मुळा, बीटरूट - प्रत्येकी एक 

२ टोमॅटो, १ कांदा, १ सिमला मिरची, 
२ काकड्या, २ उकडलेले छोटे बटाटे 
१ कप कोबी, अर्धा कप मटारचे उकडलेले दाणे 
४ काळी मिरीपूड, मीठ 

व्हेजिटेबल सलाड कृती:

गाजर, मुळा, अर्धवट शिजवलेले बीट पातळ उभे उभे चिरावेत. 
कांदा, कोबी, सिमला मिरची सुद्धा उभी बारीक चिरावी. 
काकडीच्या चकत्या व टोमॅटो-बटाट्याचे बारीक चौकोनी तुकडे करावेत. 
शक्यतो सर्व भाज्या एकसारख्याच चिराव्यात. उभ्या किंवा चौकोनी किंवा गोल काप.

कोबी किसून घेतली तरी चालेल. 
ह्या भाज्या व मोड आलेली चवळी मोठ्या बाउलमध्ये एकत्र करावी. 
वरून मिरीपूड, मीठ व लिंबू रस घालावा. आवडत असल्यास ऑलिव्ह ऑइल घालावे. 
दही घातले तरी चांगले लागते, पण मग लिंबू नको.



 Tags: Mix veggies salad for dieting recipe in marathi, diet food, salad, 

1 comment:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.