Tags: Chhole without readymade chhole masala, Kabuli Chana subzi, sabji recipe in marathi, chhole puri, chanyachi usal

छोल्यांचे मूळ उत्तर भारतात असले तरी सर्वत्र  जातात व आवडीने खाल्ले ही जातात. बाजारात अनेक छोले मसाले विकत मिळतात. पण मी ह्या रेसिपीमध्ये  मसाला वापरलेला नाहीये.

छोले करण्यासाठी लागणारे साहित्य :

अर्धा किलो छोले
२ कांदे १ टोमॅटो
५-६ पाकळ्या लसूण,
आलं, कोथिंबीर
तिखट
गरम मसाला
अख्खा मसाला - ६ काळी मिरी, २ तमालपत्र, २ मोठी वेलची (मसाला वेलची)
धणेपूड, दालचिनी पूड, मिरपूड

छोले कृती:

  • सकाळी भाजी करायची झाल्यास छोले पाण्यात रात्रभर भिजत घालावेत. रात्रीसाठी करायची असेल तर सकाळी भिजवावेत. भिजून आकाराने दुप्पट होतात मग त्याच पाण्यात कुकरमध्ये मऊ शिजवावेत पण मेण होऊ देऊ नये.
  • शिजवताना त्यात अख्खा मसाला - ६ काळी मिरी, २ तमालपत्र, २ मोठी वेलची (मसाला वेलची) घालावा.
  • छोल्याचे पाणी वेगळे काढून ठेवावे. फेकू नये.
  • कांदे आणि टोमॅटोची प्युरी करावी. लसूण व आल्याची पेस्ट करावी.
  • कढईत तेल घेऊन आलंलसूण पेस्ट घालून परतावी. कांद्याची प्युरी हलक्या गुलाबी रंगावर परतावी. टोमॅटो प्युरी घालावी. धणेजिरेपूड, हिंग, हळद घालून परतावे. तिखट घालावे.
  • थोडे जास्त तिखट घालावे ज्यामुळे रंग व चव दोन्ही येईल. तिखटा मागोमाग चिमूटभर साखरंही घालावी. यामुळे भाजीला तिखटाचा तवंग येतो व लाल दिसते.
  • परतल्यावर त्यात फक्त छोले घालावेत. त्याचे पाणी घालू नये. छोले मसाल्यात नीट ढवळले गेले कि मिनिटभर झाकण ठेवावे. मग त्यात वेगळे काढून ठेवलेले पाणी घालावे. मीठ घालावे.
  • पाव चमचा दालचिनी पूड, मिरपूड घालावी. आवश्यकते प्रमाणे पाणी घालावे.


chhole
ग्रेव्ही पातळ झाल्यास ७-८ छोल्याचे दाणे कढईतल्या कढईतच कुस्करावेत. मॅश झालेले ते दाणे दाटपणा आणतात. कोथिंबिरीने सजवावे.
विकतचा मसाला असेल तर छोले शिजवताना व फोडणीला कोणतेही मसाले नाही वापरले तरी चालतात. प्युरीमध्ये मसाला घालून तिखट व छोले नेहमीप्रमाणे करावेत.











आपला यावरचा अभिप्राय किंवा काही सुधारणा मला कमेंटमधे जरूर कळवाव्या. 


Tags: Chhole without readymade chhole masala, Kabuli Chana subzi, sabji recipe in marathi, chhole puri

1 comment:

  1. I read your Blog & Trust me it is really very nice Content AND Very Unique & Lot of knowledge … Thanks for Sharing a Very lovely Details Methya Mango Pickle Raw Mango and Fenugreek Pickle

    ReplyDelete

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.