Tags: Boiled potato vegetable aloo sabzi batata bhaji recipe in marathi,उकडलेल्या बटाट्याची भाजी, आलू सब्जी 

ही भाजी २ प्रकारे बनवता येते. खालील प्रकार हा जरा जास्त रंगीत आहे.
या आधी लिहिलेला प्रकार १ नेहमीचा आहे.

आलू सब्जी साहित्य:

४ मध्यम बटाटे
२ मध्यम कांदे
अर्धी वाटी वाफवलेले मटार 
अर्ध गाजर
हाताशी असतील तर मोड आलेली कडधान्ये
बीटरूट
आलं, ५-६ लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर

बटाट्याच्या भाजीची रेसिपी - कृती:

बटाटे धुवून कूकरमध्ये उकडावेत. पूर्ण उकडावेत.
कांदा बारीक चिरावा. 
गाजराचा व बीटाचा कीस करावा. गाजर, बीट कच्चे आवडत असल्यास कच्चेच ठेवावे. नाहीतर अर्धवट शिजवावे. मायक्रोवेव्हमध्ये बरोबर शिजते. 
मटारदाणे वाफवून घ्यावेत व हाताने कुस्करावेत; लगदा नको.
एका कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तेल कंजुषपणे घेऊ नये.
तेल गरम होईस्तोवर साले काढावीत.
गरम तेलात मोहरी तडतडली की मिरच्या, कढीपत्ता, आलं, लसूण घालावा. जरा परतल्यावर कांदा घालावा.
कांदा हलका गुलाबी होईस्तोवर बटाटे हाताने कुस्करावेत. चिरू नये, मॅश केलेले चांगले लागतात.
त्या बटाट्यावर शिजवून कुस्करलेले मटारदाणे, गाजराचा कीस, मूग किंवा मटकी जे असेल ते मोड आलेलं कडधान्यं घालावं. 
बीट सगळ्यात शेवटी घालावे व नंतर फार ढवळू नये; नाहीतर लाल रंग जास्त येतो. 
 मीठ, चिमूटभर साखर, चिरलेली कोथिंबीर, धणेजिरे पावडर, किंचित हिंग, चमचाभर हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिश्रण हातानी कालवावे. नंतर हे मिश्रण कढईत घालून व्यवस्थित ढवळावे.

१५ मिनिटात बटाटे शिजतात. आणि भाजी अगदी २ मिनिटांत होते. प्रवासाला नेण्यास उपयुक्त आहे. 
ह्या भाजीचा वापर करून बटाटेवडेटोस्ट सँडविचव्हेज ब्रेड पकोडेब्रेड पोटली, आलू पराठा असे पदार्थ बनवता येतात. पोळी, पुरी सोबत ही भाजी छान लागते.

नेहमीच्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी -
उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार १, Potato Sabzi Type 1

उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये टिकतात. आयत्या वेळेला ग्रेव्ही दाट करण्यासाठी, भाजी किंवा वडे करण्यासाठी पटकन कामी येतात.





Tags: Boiled potato vegetable aloo sabzi batata bhaji recipe in marathi,उकडलेल्या बटाट्याची भाजी, आलू सब्जी 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.