Tags: Solkadhi recipe in marathi, upwavasachi solkadi, solkadhi, kokum kadhi, amsul kadhi, kokum coconut milk kadi, upasachi kadhi, upvasache padarth, उपवासाचे पदार्थ, व्रत के लिये, उपासाला चालणारे पदार्थ रेसिपी मराठी 

१० मिनिटे - ६ जणांसाठी

To read in English click - Solkadhi For Fast recipe in English

उपासाच्या सोलकढीचे साहित्य:

१०-१२ आमसुले किंवा १ टेबलस्पून कोकम आगळ

एक नुकताच खोवलेला नारळ
२-३ हिरव्या मिरच्या,
मीठ साखर कोथिंबीर
फोडणीसाठी तूप, जिरे

उपवासाची कढी कशी करावी :

  • आमसुले पाण्यात एक दीड तास भिजत ठेवावीत व न कुस्करता काढून टाकावीत.
  • नारळ खोवून त्याचे जाड व पातळ दूध काढावे. (खोबऱ्याचे दूध कसे काढावे? click here for 'How to extract coconut milk?')
  • हिरव्या मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करावेत. कोथिंबीर बारीक चिरावी. 
  • किंवा कोथिंबीरीची उपवासाची चटणी  करूनही वापरता येते.
  • नारळाचे काढलेले दूध व आमसुलाचे पाणी एकत्र करून त्यात वरील बारीक चिरलेला अथवा पेस्ट केलेला मसाला/चटणी घालावी.
  • कोकम आगळ वापरलेलं असल्यास नारळाच्या दुधात आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून त्यात आगळ घालावे. (सोलकढी खूप पातळ झाली तर पाणचट लागते, नारळाच्या दुधाची चव राहिली पाहिजे इतपत पाणी घालावे )
  • मीठ साखर घालावी.

सोलकढीला फोडणी नाही दिली तरीही छानच लागते. मात्र वरून फोडणी देताना उपासाला चालण्याजोगी म्हणजे तूप आणि जिऱ्याची द्यावी.
जिऱ्याची पूड घालायची असेल तर मात्र अगदी वाढतानाच घालावी. आधीपासून घातली तर रंग बदलतो.


Tags: Solkadhi recipe in marathi, upwavasachi solkadi, solkadhi, kokum kadhi, amsul kadhi, kokum coconut milk kadi, upasachi kadhi, upvasache padarth, उपवासाचे पदार्थ, व्रत के लिये, उपासाला चालणारे पदार्थ रेसिपी मराठी 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.