Tags: nachnila mod kase anave nachniche mod ragi sprouts sprouted finger millet
हे versatile खाद्य आहे.नाचणीच्या पेजवर मी नाचणीबद्दलची माहिती, नाचणीच्या पाककृती थोडक्यात सांगितल्या आहेत.
सध्या नाचणीला मोड कसे आणावेत ते पाहू. मूग मटकीपेक्षा नाचणीला मोड यायला जास्त वेळ लागतो.
- बाजारातून आणलेली नाचणी आधी व्यवस्थित चाळून, निवडून स्वच्छ धुवून घ्यावी.
- रात्रभर म्हणजेच साधारण ७-८ तास साध्या पाण्यात भिजत टाकावी.
- थोडी फुगल्यावर पाणी निथळावे आणि मऊ कापडात बांधून ठेवावी. अगदी घट्ट बांधू नये.
- किंवा वेताच्या टोपलीत कापड पसरून त्यावर भिजलेली नाचणी घालावी आणि हाताने मोकळी करावी म्हणजे दाणे दाणे एकमेकांना चिकटणार नाहीत. या टोपलीवर एखादे ताट झाकण ठेवावे.
- उबदार वातावरण असल्यास मोड येतात. गॅस सिलेंडरच्या वरती किंवा डाईनिंग टेबलखाली किंवा बंद मायक्रोवेव्ह मधे हे टोपलं ठेवावं. तिथे गार हवा लागत नाही आणि ऊब मिळते.
- १० ते १२ तासांनी छोटे छोटे मोड आलेले दिसतील. अजून २-३ तास ठेवल्यावर मोड नेहमीसारखे होतील.
- पुरेसे मोठे मोड आले की वापरण्यास घ्यावी.
साधारण नाचणीपेक्षा मोड आलेल्या नाचणीमध्ये कितीतरी पटीने जास्त nutritions असतात. त्यामुळेच मोड आलेल्या नाचणीचे पीठ सगळ्यात उत्तम आहे. पीठ करण्याच्या पद्धती आणि नाचणी सत्व करण्याची पद्धत लिहिलेली आहे.
नाचणीच्या विविध पदार्थांसाठी इथे क्लिक करा.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.