chakawat sabji chakavat bhaji recipe in marathi

चाकवत भाजी साहित्य:

चाकवत - १ जुडी 
ताजे ताक - ५ वाट्या 
हिरव्या मिरच्या - ३-४
लसूण पाकळ्या - ४-५
ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचे पातळ काप 
बेसन - १ टेबलस्पून 
भिजवलेले शेंगदाणे किंवा चणाडाळ - १/४ वाटी 
गोडा मसाला, फोडणीचे सामान, आलं, कढीपत्ता 

ताक चाकवत कृती:

  • चाकवताची पाने निवडून चांगी धुवून बारीक चिरावी. आवडीप्रमाणे शेंगदाणे किंवा चण्याची डाळ आधी पाण्यात भिजत ठेवावी. खोबऱ्याचे पातळ काप करून ठेवावे. 
  • पातेल्यात नेहमीची फोडणी करून त्यात कढीपत्ता, लसूण आणि मिरच्या घालाव्या. भिजवलेले दाणे किंवा डाळ, आणि खोबऱ्याचे काप घालून परतल्यावर चिरलेला चाकवत घालावा. 
  • व्यवस्थित परतून झाकण ठेवावे. झाकणावर जरा पाणीही ठेवून वाफेवर शिजवावा. चाकवत शिजायला ३-४ मिनिटेच लागतात. 
  • तो पर्यंत ताजे ताक घेऊन त्यात किसलेलं आलं, चिमूटभर साखर, भाजीच्या अंदाजाने मीठ, एखादी लसूण पाकळी ठेचून घालावी. 
  • ताकाला बेसन लावून ठेवावे. कॉर्नफ्लोअर लावले तरी चालेल. 
  • झाकण काढून शिजलेला चाकवत चांगला घोटून घ्यावा. त्यात ताकाचे मिश्रण आणि गोडा मसाला घालावा. 
  • उकळून एकजीव करावे. Hand-mixer किंवा रवी वापरून ताक आणि चाकवत एकजीव पटकन होतो. 
  • दुसऱ्या कढल्यात तेल+जिरं+ठेचलेली लसूण+हिंग यांची फोडणी करावी व ती भाजीला वरतून द्यावी. 
  • अजून एखादी उकळी आणून खाली उतरवावे. 


1 comment:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.