Tags: Chhole without readymade chhole masala, Kabuli Chana subzi, sabji recipe in marathi, chhole puri, chanyachi usal

छोल्यांचे मूळ उत्तर भारतात असले तरी सर्वत्र  जातात व आवडीने खाल्ले ही जातात. बाजारात अनेक छोले मसाले विकत मिळतात. पण मी ह्या रेसिपीमध्ये  मसाला वापरलेला नाहीये.

छोले करण्यासाठी लागणारे साहित्य :

अर्धा किलो छोले
२ कांदे १ टोमॅटो
५-६ पाकळ्या लसूण,
आलं, कोथिंबीर
तिखट
गरम मसाला
अख्खा मसाला - ६ काळी मिरी, २ तमालपत्र, २ मोठी वेलची (मसाला वेलची)
धणेपूड, दालचिनी पूड, मिरपूड

छोले कृती:

  • सकाळी भाजी करायची झाल्यास छोले पाण्यात रात्रभर भिजत घालावेत. रात्रीसाठी करायची असेल तर सकाळी भिजवावेत. भिजून आकाराने दुप्पट होतात मग त्याच पाण्यात कुकरमध्ये मऊ शिजवावेत पण मेण होऊ देऊ नये.
  • शिजवताना त्यात अख्खा मसाला - ६ काळी मिरी, २ तमालपत्र, २ मोठी वेलची (मसाला वेलची) घालावा.
  • छोल्याचे पाणी वेगळे काढून ठेवावे. फेकू नये.
  • कांदे आणि टोमॅटोची प्युरी करावी. लसूण व आल्याची पेस्ट करावी.
  • कढईत तेल घेऊन आलंलसूण पेस्ट घालून परतावी. कांद्याची प्युरी हलक्या गुलाबी रंगावर परतावी. टोमॅटो प्युरी घालावी. धणेजिरेपूड, हिंग, हळद घालून परतावे. तिखट घालावे.
  • थोडे जास्त तिखट घालावे ज्यामुळे रंग व चव दोन्ही येईल. तिखटा मागोमाग चिमूटभर साखरंही घालावी. यामुळे भाजीला तिखटाचा तवंग येतो व लाल दिसते.
  • परतल्यावर त्यात फक्त छोले घालावेत. त्याचे पाणी घालू नये. छोले मसाल्यात नीट ढवळले गेले कि मिनिटभर झाकण ठेवावे. मग त्यात वेगळे काढून ठेवलेले पाणी घालावे. मीठ घालावे.
  • पाव चमचा दालचिनी पूड, मिरपूड घालावी. आवश्यकते प्रमाणे पाणी घालावे.


chhole
ग्रेव्ही पातळ झाल्यास ७-८ छोल्याचे दाणे कढईतल्या कढईतच कुस्करावेत. मॅश झालेले ते दाणे दाटपणा आणतात. कोथिंबिरीने सजवावे.
विकतचा मसाला असेल तर छोले शिजवताना व फोडणीला कोणतेही मसाले नाही वापरले तरी चालतात. प्युरीमध्ये मसाला घालून तिखट व छोले नेहमीप्रमाणे करावेत.











आपला यावरचा अभिप्राय किंवा काही सुधारणा मला कमेंटमधे जरूर कळवाव्या. 


Tags: Chhole without readymade chhole masala, Kabuli Chana subzi, sabji recipe in marathi, chhole puri

Related Posts:

  • छोले, काबुली चणे, Chhole without readymade chhole masala, Kabuli chane sabzi Tags: Chhole without readymade chhole masala, Kabuli Chana subzi, sabji recipe in marathi, chhole puri, chanyachi usal छोल्यांचे मूळ उत्तर भारतात असले तरी सर्वत्र  जातात व आवडीने खाल्ले ही जातात. बाजारात अनेक छोले… Read More
  • मटकीची उसळ, Sprouted moth sabzi matakichi usal, matkichi bhaji, sprouted moth sabji, moth sabzi मिसळीसाठी मटकीची उसळ करायची असल्यास करण्याची पद्धत जरा बदलते.  ती पद्धत मिसळीसाठी उसळ इथे दिली आहे.  मोड येण्यास वेळ - १४ तास  करण्यास वेळ - २०… Read More
  • केळफुलाची भाजी Banana Flower Veg Tags: Kelfulachi bhaji, kelphul bhaaji, kele ke ful ki sabji, banana flower sabji, केळीच्या फुलाची भाजी  ३० मिनिटे - ५-६ जणांसाठी  इंग्लिशमध्ये रेसिपी वाचण्यासाठी - Banana Flower Vegetable Recipe केळफुलाची… Read More
  • चना मसाला, चण्याची उसळ, काळ्या वाटाण्याची भाजी Tags: chana masala, chanyachi usal, kale vatane, वाटाण्याची उसळ, kalya vatanyachi bhaji चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात; भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ … Read More
  • मिसळीसाठी उसळ, Sabji for Misal misalisathi usal, sabji for misal, misal sabzi चमचमीत मिसळीचा बेस कडधान्ये आणि रस्सा/सॅम्पल हाच असतो. कोणत्याही कडधान्यांची उसळ आपण मिसळ करण्याकरता वापरू शकतो. फक्त करण्याची पद्धत थोडी बदलते आणि तिखट तेज होते. खाली दिलेल्या… Read More

1 comment:

  1. I read your Blog & Trust me it is really very nice Content AND Very Unique & Lot of knowledge … Thanks for Sharing a Very lovely Details Methya Mango Pickle Raw Mango and Fenugreek Pickle

    ReplyDelete

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

519,395

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.