Stuffed simla mirch Stuffed dhabbu mirchi recipe in marathi, स्टफ्ड मिरची
लहान सिमला मिरची असतील तर भाजी पटकन शिजते आणि खाण्यासही सोपी पडते. याचे दोन प्रकार आहेत. या पोस्टमध्ये साधी पद्धत दिली आहे. दुसरी पद्धत भरली सिमला मिरची प्रकार २ मध्ये लिहीलेली आहे.भरवा मिर्च साहित्य:
ढब्बू मिरच्या - सारख्या आकाराच्या अर्धा किलोबेसन
जाडसर दाण्याचं कूट
सुकं खोबरं - अर्धी वाटी
तिखट, मिठ, हिंग, हळद, धणेजिरे पूड,
लिंबू, कोथिंबीर
सिमला मिरचीची भाजी - कृती:
ढब्बू मिरच्यांना खालून चीर द्या. धारदार सुरीने जमल्यास बिया काढा.अर्धी वाटी सुकं खोबरं किसून भाजा. व हाताने कुस्करा.
४ टेबलस्पून बेसन तेलावर भाजून त्यानं दाण्याचे कूट, भाजलेलं सुकं खोबरं, तिखट, मिठ, हिंग, हळद, धणेजिरे पूड घालून लिंबूरस घालून एकत्र करा. आणि मिरच्यांमध्ये भरा.
भरलेल्या ढब्बू मिरच्या फोडणीला घालून परतावा.
झाकण ठेऊन झाकणावर पाणी घालून शिजवा.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.