Tags: chavli chi usal, chawli chi bhaji black eyed peas sabzi with gravy
लहान चवळी आणि मोठी चवळी अशा दोन प्रकारची चवळी बाजारात असते. मोठी चवळी शिजायला आणि चवीला चांगली असते.Chavli chi usal |
भिजवण्यासाठी वेळ - ६ तास; कृतीस वेळ - २० मिनिटे
चवळीच्या उसळीचे साहित्य:
चवळी - २ वाट्याकांदा - १ मध्यम
लसूण - ४-५ पाकळ्या
काळा मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला
गूळ मिरच्या कोथिंबीर ओलं खोबरं
चवळीची उसळ रेसिपी :
- चवळी निवडून धुवून साधारण ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावी. दाणे फुगून मोठे होतात.
- भिजलेली चवळी कुकरमध्ये जास्त पाणी घालून शिजवावी. एक शिट्टी झाल्यावर लगेच वाफ मोकळी करून झाकण काढावे म्हणजे दाणे अख्खे राहतील.
- चवळीचे पाणी फेकू नये. ते उसळीत घालता येते किंवा त्याचे कळण बनवता येते. हे कळण खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे. रेसिपी कडधान्यांचे कळण इथे दिली आहे. इतर कडधान्यांपेक्षा चवळीच्या पाण्याचे कळण मस्त दाट होते.
- चवळी शिजेपर्यंत कांदा, कोथिंबीर बारीक चिरावे. लसूण ठेचावी. जिरे, मिरची, ओले खोबरे आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवावी.
- कढईत तेल गरम करून नेहमीची मोहरी+जिरं+हिंग+हळदीची फोडणी करावी. वाटणातील मिरच्या जास्त तिखट नसतील तर फोडणीत किंचित तिखट घालावे.
- काळा मसाला टाकावा. कांदा-लसूण मसाला किंवा उसळ मसाला घालूनही चविष्ट लागते.
- लसूण आणि कांदा परतावा.
- वाटलेला मसाला फोडणीत घालून लगेचच शिजवलेली चवळी फोडणीस टाकावी. फोडणी आणि मसाला चवळीच्या सर्व दाण्यांना लागला पाहिजे असे ढवळावे.
- २ मिनिटे झाकण ठेऊन एक वाफ आणावी. नंतर दीड वाटी पाणी अंदाजाने टाकावे.
- मीठ, धणे जिरे पावडर घालावी. चिंचोक्याएवढा गूळ घालावा.
- जसजशी चवळी शिजते, तसतसा रस आटत जातो. त्यामुळे पाणी जरा जास्त वाढवावे.
- पळीभर चवळी बाहेर काढून मॅश करावी आणि परत भाजीत घालावी. यामुळे रसाला घट्टपणा येतो.
फोडणीत टोमॅटो चिरून घातल्यास चव आणि रंग छान येतो.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.