Tags: नाचणीचे सत्त्व nachniche sattva satva how to make ragi malt marathi recipe nachni che satva

यात आधी नाचणीला मोड आणले जातात. त्यामुळे आधीपासून असलेले सर्व पौष्टिक घटक अजून वाढतात. आणि म्हणूनच या प्रकारे केलेलं पीठ जरी थोडं वेळखाऊ असलं तरी भरपूर पौष्टिक आहे. लहान मुलांना शक्यतो हेच पीठ द्यावे. 
नाचणीचं पीठ करण्याच्या इतर पद्धती लिंकवर वाचता येतील. 
नाचणीला मोड कसे आणावे ते आधीच्या पोस्टवर वाचलं असेलंच. 
मोड आलेली नाचणी सावलीत एका कापडावर किंवा मोठ्या ताटात पसरवून ठेवावी. 
ही नाचणी सावलीत वाळवायची आहे. 7-8 तासात पूर्ण कोरडी होईल. 
हाताने अलगद पसरावी म्हणजे मोकळी होईल.
जाड तळाच्या भांड्यात मंद गॅसवर भाजावी. काहीजण तुपात परततात;पण खास आवश्यकता नाही.
भाजताना सारखं ढवळावं लागतं. नाहीतर नाचणीचा गोळा गुठळ्या होतो. भाजका वास आला की थांबावे. 

नाचणी पटकन दळली जात नाही. बराच वेळ मिक्सर चालवावा लागतो. किंवा बाहेरून दळून आणावी. 
मोड आलेल्या नाचणीचे पीठ म्हणजेच नाचणी सत्व. 

नाचणीच्या पिठापासून बनवले जाणारे सर्व पदार्थ शक्यतो नाचणी सत्वातच बनवावेत. 
पोषकचे नाचणी सत्व साखरयुक्त आणि साखरविरहित असे दोन प्रकारचे मिळते. साखरयुक्त सत्व दुधातून करतात आणि साखर विरहित ताकातून करतात. दोन्ही प्रकार अगदी झटपट होणारे आणि चविष्ट आहेत. पाककृती लिंकवर लिहिलेल्या आहेत. 
Also Read: नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीस 

Tags: नाचणीचे सत्त्व nachniche sattva satva how to make ragi malt marathi recipe nachni che satva

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.