Tags: ओल्या खोबऱ्याच्या करंज्या, करंजी, दिवाळी फराळ, खोबऱ्याची करंजी, नारळाची करंजी, coconut karanji, olya naralachya karanjya, naralachi karanji, diwali faral

ओल्या खोबऱ्याच्या करंज्या, करंजी, दिवाळी फराळ, खोबऱ्याची करंजी, नारळाची करंजी, coconut karanji, olya naralachya karanjya, naralachi karanji, diwali faral
Khobryachi Karanji
 करंजी हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. बरेच दिवस टिकवायच्या असतील तर या सुके खोबरे घालून बनवतात. पटकन करायच्या झाल्यास ओल्या नारळाच्या बनवतात. अतिशय चविष्ट, गोड, आणि जिभेवर ठेवताच पटकन विरघळणाऱ्या करंज्या !
इथे पटकन होणारी ओल्या खोबऱ्याची करंजी कशी करावी ते बघू.



करंजीचे साहित्य :

खोवलेलं खोबरं - १ वाटी
साखर - पाऊण वाटी
वेलचीपूड, तूप
गव्हाचे पीठ - अंदाजे १ वाटी 
बारीक रवा - १ चमचा 
तेल किंवा तूप

ओल्या नारळाची करंजी कृती :
पारी व सारण - 

  • सर्वप्रथम पारी करावी.  
  • गव्हाचं पीठ आणि बारीक रवा एकत्र करून. तेलाचे मोहन घालावे. घट्ट भिजवावा. 
  • सारण होईपर्यंत झाकून ठेवावे. 
  • सारणासाठी खोबरं आणि साखर एकत्र करून ढवळावी. ५ मिनिटे मिश्रण तसेच राहू द्यावे. 
  • चमचाभर तुपात हे मिश्रण मंद आचेवर हलकेच परतावे. 
  • किंचित चिकट होईल इतकेच परतावे. खोबऱ्याचा रंग नाही बदलला तरी चालेल. 
  • गॅस बंद करून झाकण ठेवावे. 

करंजी करण्याची पद्धत -

  • भिजवलेल्या कणकेचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. त्याच्या पुऱ्या लाटून ठेवाव्या. 
  • कोरड्या पडू नयेत म्हणून फडक्याने झाकाव्यात. १ वाटीभरच सारण असेल तर पटापट केल्यास झाकून ठेवण्याची गरज पडत नाही. 
  • टाळण्यासाठी तेल किंवा तूप गरम करत ठेवावे. तुपात मस्तच लागतात; पण डालडा तूप नकोच. 
  • पुरीच्या मध्यावर सारण ठेवून तिची घडी घालावी. सारण कडेला येऊ देऊ नये. कडा एकमेकांवर जोडून बोटानी दाबून चिकटवाव्या. आत हवा नको. 
  • करंजीच्या चमच्याने आकार देऊन सगळ्या करंज्या करून झाल्या कि एक एक तळावी. 

Tags: ओल्या खोबऱ्याच्या करंज्या, करंजी, दिवाळी फराळ, खोबऱ्याची करंजी, नारळाची करंजी, coconut karanji, olya naralachya karanjya, naralachi karanji, diwali faral

2 comments:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.