Tags: ओल्या खोबऱ्याच्या करंज्या, करंजी, दिवाळी फराळ, खोबऱ्याची करंजी, नारळाची करंजी, coconut karanji, olya naralachya karanjya, naralachi karanji, diwali faral
Khobryachi Karanji |
इथे पटकन होणारी ओल्या खोबऱ्याची करंजी कशी करावी ते बघू.
करंजीचे साहित्य :
खोवलेलं खोबरं - १ वाटीसाखर - पाऊण वाटी
वेलचीपूड, तूप
गव्हाचे पीठ - अंदाजे १ वाटी
बारीक रवा - १ चमचा
तेल किंवा तूप
ओल्या नारळाची करंजी कृती :
पारी व सारण -
- सर्वप्रथम पारी करावी.
- गव्हाचं पीठ आणि बारीक रवा एकत्र करून. तेलाचे मोहन घालावे. घट्ट भिजवावा.
- सारण होईपर्यंत झाकून ठेवावे.
- सारणासाठी खोबरं आणि साखर एकत्र करून ढवळावी. ५ मिनिटे मिश्रण तसेच राहू द्यावे.
- चमचाभर तुपात हे मिश्रण मंद आचेवर हलकेच परतावे.
- किंचित चिकट होईल इतकेच परतावे. खोबऱ्याचा रंग नाही बदलला तरी चालेल.
- गॅस बंद करून झाकण ठेवावे.
करंजी करण्याची पद्धत -
- भिजवलेल्या कणकेचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. त्याच्या पुऱ्या लाटून ठेवाव्या.
- कोरड्या पडू नयेत म्हणून फडक्याने झाकाव्यात. १ वाटीभरच सारण असेल तर पटापट केल्यास झाकून ठेवण्याची गरज पडत नाही.
- टाळण्यासाठी तेल किंवा तूप गरम करत ठेवावे. तुपात मस्तच लागतात; पण डालडा तूप नकोच.
- पुरीच्या मध्यावर सारण ठेवून तिची घडी घालावी. सारण कडेला येऊ देऊ नये. कडा एकमेकांवर जोडून बोटानी दाबून चिकटवाव्या. आत हवा नको.
- करंजीच्या चमच्याने आकार देऊन सगळ्या करंज्या करून झाल्या कि एक एक तळावी.