Tags: chana masala, chanyachi usal, kale vatane, वाटाण्याची उसळ, kalya vatanyachi bhaji
चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात; भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.Chana Masala |
भिजण्यास वेळ - ८ तास
मोड येण्यास वेळ - १६ तास
करण्यास वेळ - २० मिनिटे
मोड येण्याची आवश्यकता नाही. नुसते भिजलेले चालतात.
चना मसालाचे साहित्य :
काळे वाटाणे - २ वाट्याकांदे - २ मध्यम
टोमॅटो - १ मध्यम
लसूण - ६-७ पाकळ्या
आलं, कोथिंबीर
चना मसाला / छोले मसाला / गरम मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला - काहीही एक
चना मसाला कृती :
- चणे उकडावेत. अगदी लगदा नको.
- कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी करावी.
- लसणीच्या पाकळ्या ठेचाव्या. आलं ठेचावं.
- कढईत नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घ्यावे. गरम झाल्यावर त्यात जराशी मोहरी टाकून तडतडल्यावर हिंग, हळद, ठेचलेलं आलं आणि ठेचलेली लसूण घालावी.
- सतत परतावे व तयार केलेली कांद्याची पेस्ट घालावी. १-२ मिनिटे परतल्यावर चना मसाला / छोले मसाला / गरम मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला (यांपैकी जे उपलब्ध असेल ते), तिखट टाकून पुन्हा परतावे. यानंतर त्यात अर्धा चमचा साखर घालावी. त्यामुळे भाजीला तेलाचा तवंग येतो.
- अजून ४-५ मिनिटे परतून टोमॅटो पेस्ट घालावी आणि बाजूबाजूने तेल सुटे पर्यंत ढवळत राहावे.
- उकडलेले चणे टाकून व्यवस्थित ढवळावे. किंचित पाणी घालून शिजवावे .
- या भाजीला जास्त रस नसावा. पण पूर्ण कोरडीसुद्धा करू नये.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.