Tags: what to do with the stalk of boiled sprouts


उसळी करण्यासाठी बरेचदा मोड आलेली कडधान्ये कुकरमधे आधी शिजवून घेतली जातात. 
शिजल्यावर कडधान्यांचे जे पाणी उरते ते पौष्टिक असते. त्याचा उपयोग उसळींना रस ठेवण्यासाठी  येतोच; पण त्याच बरोबर या पाण्याचे कळणअसं नवीन चविष्ट पेय बनवता येतं; तेही झटपट. 

कळण नुसते पिता येते. पचायला सोपे जाते. ताप, अपचन इ मुळे अरुची झाली असल्यास कळण जरून द्यावे. तोंडाला चव येते. मिरपुडीमुळे अन्न पचून भूक लागते. कडधान्यांचा स्टॉक असल्याने शरीरास आवश्यक घटक मिळतात. 

साहित्य:

कोणतेही कडधान्य शिजवल्यावर राहणारे पाणी (स्टॉक)
दही किंवा ताक 
मीठ, मिरपूड, किंचित साखर 
नेहमीच्या फोडणीचे साहित्य 

कृती:

  • दही घुसळून ताक करावे. हे ताक कडध्यान्याचा स्टॉकमधे घालावे. 
  • प्रमाण ठराविक नाही. आवडीप्रमाणे घ्यावे. कमी जास्त कसेही. 
  • त्यात मीठ मिरपूड घालावी. ताक आंबट असले तर साखर घालावी. आणि ढवळावे. 
  • कढल्यात तेल+मोहरी+जिरं+हिंग+तिखट यांची फोडणी करून ती मिश्रणाला वरून द्यावी. 
  • हळदीने रंग बदलतो म्हणून हळद नको. 
  • गरम करण्याची गरज नाही. फोडणी घालून ढवळले की कळण तयार. 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.