Lasanichi chatani lasnichi chatni Garlic chutney lasun chatani recipe in marathi
लसणीची चटणी टिकाऊ, करायला अतिसोपी आणि चविष्ट असते. भाजी आमटीत लसणीऐवजी लसूण चटणी घातली तरी निराळाच स्वाद येतो.
लसूण चटणी ओल्या खोबऱ्याची आणि सुक्या खोबऱ्याची अशी २ प्रकारे करता येते.
ओल्या खोबऱ्याची लसूण चटणी अगदी २ मिनिटात झटपट होणारी आहे. पण ओलं खोबरं असल्याने २-३ दिवसच टिकते. खाली लिहिलेली चटणी सुकं खोबरं असल्याने कितीही दिवस टिकते.
लसूण पाकळ्या - १२-१५
तीळ - पाव वाटी
सुक्या खोबऱ्याचा कीस - पाव वाटी
दाण्याचं कूट - पाव वाटी
तिखट - ३ चमचे
मीठ, हिंग, चिंच
लसूण चटणीची कृती:
- तीळ व सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा.
- लसूण ग्राइंडर मधून फिरवावी. त्यात भाजके तीळ, भाजलेलं खोबरं आणि दाण्याचं कूट घालून थोडं परत वाटावे.
- तिखट, मीठ, जरासा हिंग आणि आंबटपणासाठी चिंचोके नसलेली चिंच ग्राईंडरमधे घालून सर्व वाटून एकजीव करावे.
- तेल सुटू लागले कि थांबावे.
ओलं खोबरं वापरून लसूण चटणी अगदी झटकन करता येते पण पद्धत थोडी वेगळी आहे.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.