Tags: Moong Recipes, Mung sabji, मुगाची भाजी, मुगाचे वरण, मूंग की दाल , मूगाची डाळ
सालीसकट असलेली मुगाची डाळ आणि कोथिंबीर यामुळे या आमटीला हिरवा रंग येतो.तुरीपेक्षा मूग पचायला सोपे जातात.
मुगाच्या वरणाचे साहित्य:
सालीसकट मुगाची डाळ - दीड वाटीओलं खोबरं - अर्धी वाटी
निवडून, धुवून, बारीक चिरलेली कोथिंबीर - १ वाटी
निवडून धुवून पुदिना पाने - अर्धी वाटी
फोडणीसाठी तेल किंवा तूप
लवंग २
काळीमिरी ४
दालचिनीचा बोटभर लांब तुकडा
तमालपत्र १
लसूण ६ पाकळ्या
मीठ लिंबू
मुगाची आमटी कृती:
मुगडाळ धुवून, हिंग हळद पाणी घालून कुकरमध्ये शिजवायची.नारळ, कोथिंबीर, मिरच्या लसूण पुदिना ग्राइंड करून चटणी करावी; पाणी घालू नये. सविस्तर कृती कोथिंबीर चटणी व पुदिना कोथिंबीर चटणी इथे दिलेली आहे.
ही चटणी शिजलेल्या वरणात घालून एकजीव करावी.
कढईत तेल हेरून त्यात वर लिहिलेला अख्खा मसाला घालावा. तेल ऐवजी तुपाची फोडणीसुद्धा करता येते.
तडतडल्यावर त्यात हिंग मोहरी हळद घालावे. व शिजलेले वारं घालावे. गरजेनुसार पाणी मीठ घालून उकळी आणावी.
आंबटपणासाठी लिंबू वापरावे. चिंच किंवा आमसूल शक्यतो नको, त्याने रंग बदलतो.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.