Tags: Ragi instant dosa, nachaniche instant dose nachnicha dosa instant crepe finger millet
नाचणीचे पीठ करून ते आंबवून केलेल्या डोशाप्रमाणे नाचणीचे इन्स्टंट डोसेदेखील केले जातात.नाचणीच्या इन्स्टंट इडल्या आणि इन्स्टंट डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.
नाचणीच्या इन्स्टंट डोशाचे साहित्य :
१ वाटी नाचणीचे पीठ
१ वाटी बारीक रवा
अर्धी वाटी उडीद डाळ
१ वाटी आंबट दही
अर्धा चमचा इनो (फ्रुट सॉल्ट)
मीठ
तेलाची फोडणी - ऐच्छिक
नाचणीच्या झटपट डोशाची कृती :
- अर्धी वाटी उडीद डाळ गरम पाण्यात अर्धा तास भिजवावी.
- बारीक रवा अर्धा तास बेताच्या पाण्यात मिश्रण थलथलीत असावे.
- उडीद डाळ बारीक वाटावी. थांबून थांबून वाटल्याने ती हलकी होते.
- बारीक रवा मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना त्यात नाचणीचे पीठ घालावं.
- उडदाची पेस्ट, रवा, नाचणी एकत्र एकजीव करावे. त्यात वाटीभर आंबट दही आणि अंदाजे मीठ घालून ढवळावे.
- या मिश्रणात अंदाजे पाणी आणि मीठ घालावे. इडली करतो त्यापेक्षा थोडे अधिक पाणी घालून मिश्रण पातळसर करावे.
- इनो किंवा सोडा यापैकी काहीही एक चालेल. शक्यतो इनोच बरं कारण कधी कधी सोड्याला वास येतो.
- इनो फार जुने नसावे. अर्धा चमचा इनो घालून ढवळल्यावर गरम तव्यावर पातळ डोसे घालावेत.
- आवडत असल्यास, इनो घालून झाल्यावर, तेल+मोहरी+कढीपत्ता+हिंग अशी फोडणी करून मिश्रणात घालावी.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नाचणी तांदूळ उडदाप्रमाणे एकजीव होत नाही. Standing मिश्रणात खाली तळाशी बसते. म्हणून प्रत्येक वेळेला मिश्रण खाली वर मगच डोसे करावे.
नाचणीपीठ आंबवून त्याचे डोसे करण्यासाठी लिंकवर पाककृती लिहिली आहे.
Also Read: नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपी
Also Read: नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपी
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.