Tags: भाकरी jowar bhakari, bhakri, jowar recipes, jwari bhakri.

jowar flatbread, jowar ki bhakri, jwari chi bhakari
Jwari bhakri

रात्रीच्या जेवणात पोळ्यांऎवजी ज्वारीच्या भाकरीचा समावेश केला तर पचनाला हलके होते. 
ज्वारीचे पीठ करून त्या पिठाची भाकरी करता येते किंवा ज्वारी भाजून, फोडून, त्याच्या लाह्यांचे पीठ करून त्याचीही भाकरी करता येते. लाह्यांच्या पिठाची भाकरी जरा गडद रंगाची होते. पचायला अजून हलकी. 
याच प्रमाणे बाजरीची भाकरीही करता येते. 


१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी 


ज्वारीच्या भाकरीसाठी साहित्य:

३ वाट्या ज्वारीचे किंवा ज्वारीच्या लाह्यांचे पीठ - २ वाट्यांमध्ये साधारण ३ मोठ्या भाकऱ्या होतात. 
गरम पाणी 
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडे पीठ 
आवडत असल्यास तीळ 

ज्वारीची भाकरी कशी करावी - कृती:

पीठ एका परातीत घ्यावे. त्यात किंचितसे मीठ घालावे. सवयीने तेल अजिबात घालू नये. 
थोडे थोडे गरम पाणी घालून पीठ मऊ होईस्तोवर मळावे.
थोडेसे पाणी एका वाटीत घेऊन ठेवावे. 
सुरुवातीला सवय नसल्यास प्लॅस्टिकच्या पेपरवर/पिशवीवर भाकऱ्या कराव्यात. नंतर सवयीने परातीतही करता येतात. प्लास्टिकवर त्यामानाने पीठ कमी लागते. 
प्लास्टिक किंवा परातीत थोडे पीठ भुरभुरावे. भिजवलेल्या पिठाचा एक गोळा चापट करून त्यावर ठेवावा. 
वरून पीठ लावत लावत सर्व बाजूने गोलाकार दाब देत त्या गोळ्याचा आकार वाढवत न्यावा. 
पोळीसारखी उलटीपालटी करू नये. कडा पातळ पण मध्य भाग त्यापेक्षा जाड ठेवावा. 
भाकरी गोलाकार हवी आणि बोटांचे ठसे उमटवू नये. 
ज्वारी-बाजरीच्या भाकरीला तीळ लावतात. थापून झाली की वरून तीळ पसरवावेत व हलकेच दाबावे. 
तयार भाकरीवर हलकेच हात ठेऊन प्लास्टिकसकट उचलावे व हातावर उलटे करावे. पीठ/तीळ लावलेला वरचा भाग हातावर येईल मग प्लास्टिक पेपर अलगद दूर करावा. 
गरम तव्यावर हि भाकरी चटकन टाकावी. प्लस्टिक पेपरचा भाग तव्यावर आणि पीठ लावलेला भाग वर असला पाहिजे. गॅस मध्यम-मोठा असावा. 
वाटीत घेऊन ठेवलेले पाणी एका पसरट चमच्याने तव्यावरच्या भाकरीला सगळीकडे लावावे. गरम असल्याने पटकन जिरून जाईल. लगेचच भाकरी उलटावी. अर्धकच्चं भाजलं गेलं असेल. पण चालेल कारण नंतर हीच बाजू गॅसवर भाजायची आहे. तेव्हा पूर्ण भाजली जाईल. 
उलटल्यावर ती बाजू मध्यम आच ठेऊन पूर्ण भाजावी. तो पर्यंत दुसरी भाकरी करून होते. 
तव्यावर भाकरी सतत फिरवली पाहिजे नाहीतर करपते, चिकटते. 
एक बाजू पूर्ण भाजली गेली की चिमट्याने भाकरी भाकरी उचलावी. तवा पटकन काढावा आणि मगाचची अर्धवट भाजलेली बाजू गॅसवर येईल अशी उलटवून थेट गॅस वर टाकावी. फुलक्याप्रमाणे भाजून फुगेल. 


थोडे जास्तीचे पण महत्वाचे 

कोणत्याही भाकरीसाठी जुने पीठ घेऊ नये. त्याने कडांना भेगा पडतात. नवीन पीठ असेल तर साधे पाणी घेतले तरी चालते. पण जुने पीठ गरम पाण्याने मळावे. 
प्रत्येक भाकरी फुगतेंच. फक्त समान थापली गेली पाहिजे. कडा मध्य भागापेक्षा पातळ हव्या कारण मध्यभाग थेट गॅसवर ठेवला जातो. आणि तव्यावर फिरवत राहावे. 
भाकरीला पाणी लावल्याने खाताना कोरडेपणा जाणवत नाही. 
जुन्या बायका सवयीने हातानेच पाणी लावतात; पण सवय नसल्यास चमचा वापरावा. हातावर वाफ येते. 
दोन भाकऱ्यांदरम्यान फडक्याने तवा पुसून घ्यावा म्हणजे जास्तीचं पीठ निघून जाईल व दुसरी भाकरी बिघडणार नाही. 
सुरुवातीला प्लास्टिक पेपरवरच करावे. नंतर ताटात किंवा परातीतही करता येतात. 

वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्यांसाठी इथे क्लिक करा. 


Tags: भाकरी jowar bhakari, bhakri, jowar recipes, jwari bhakri.

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.