Tags: Ragi malt for diabetes, nachni satva in curd buttermilk, takatil nachni satva for diabetes baby food
नाचणीचे सत्व कसे करावे याची माहिती लिंकवर आधी वाचलीच असेल.घरी करायला जमलं नाही तर बाजारात पोषकचे २ प्रकारचे नाचणी सत्व मिळते. साखरेसह आणि साखरेशिवाय. साखर आणि दूध घालून सत्व करण्याची पद्धत बद्दल आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे .
दोन्ही प्रकारे चविष्ट आणि अगदी झटपट पदार्थ करता येतात. मधुमेही व्यक्तींनी शक्यतो बिना साखरेचे सत्व वापरावे. लहान बाळांना चवीत बदल म्हणून देता येते. कोणीही व्यक्ती आवडीने खाईल असा हा पदार्थ आहे.
ताकातील नाचणी सत्वाचे साहित्य
नाचणी सत्व - १ चमचागोड दही किंवा ताजे गोड ताक - २ वाट्या
मीठ
मिरपूड - अगदी चिमूटभर
ताकातील नाचणी सत्वाची कृती :
- गोड दह्यात थोडे पाणी घालून ताक करावे.
- ताज्या ताकात चमचाभर नाचणीचे सत्व, मीठ आणि किंचित मिरपूड घालावी.
- ढवळून मिश्रण सारखे करावे.
- बारीक गॅसवर हे मिश्रण ठेऊन सतत चमच्याने ढवळत राहावे. ३-४ मिनिटांत जसजशी नाचणी शिजेल, तसतसे मिश्रण घट्ट होत येईल.
- ढवळणे थांबवल्यास लगेच गुठळ्या होतात.
- घट्ट झाले कि ताकातील सत्व तयार झाले.
याचीच दुसरी पद्धत म्हणजे ताकात न शिजवता, मीठ मिरपूड घालून नाचणी सत्व पाण्यात शिजवावे. घट्ट झाल्यावर वरून ताक घालावे.
दोन्ही पद्धतीने केले तरी पटकन होते आणि चविष्ट लागते.
नाचणीच्या इतर पाककृती नाचणीच्या पेजवर वाचता येतील.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.