Tags: shevbhaji, shevechi bhaji, vidarbha recipes, sevbhaji sev ki subzi, वैदर्भी पदार्थ,

shevbhaji


शेवभाजी बनवण्यासाठी कमीतकमी गोष्टी लागतात. कांदा लसूण टोमॅटो शेव बस इतकंच! 
विदर्भ प्रांतात प्रामुख्याने केली जात असल्याने भरपूर तेल आणि भरपूर तिखट !! 







शेवभाजीचे साहित्य:

तेल
कांदे
टोमॅटो 
लसूण 
तिखट 
कोथिंबीर 
जाडी शेव - तिखट 
काजू, गरम मसाला 

शेव भाजीची कृती:

  • कांद्याची पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी कांद्याचे मोठे तुकडे करून एका कढईत जरासं तेल, हिंग आणि जिऱ्यासोबत थोडे परतावेत. 
  • परतताना थोडे काजू घातल्याने उग्रपणा निघून जातो. 
  • परतलेले कांदे, काजू ग्राईंडरमधे घेऊन किंचित मीठ, आवश्यक तिखटाच्या अर्धे तिखट, हिंग, गरम मसाला घालून पूर्ण ग्राइंड करावे. लाल टेस्ट होते. गरम मसाला कमी तिखट असल्यास त्यात काळी मिरी, अर्धी मसाला वेलची घालावी. 
  • केप्रचा शेवभाजी मसाला मिळतो. तो वापरायला हरकत नाही पण तो विशेष तिखट नसतो. विदर्भाच्या तुलनेत फारच फिका पडतो. 
  • २ कांदे असल्यास अर्धा टोमॅटो या प्रमाणात टोमॅटो घेऊन ग्राइंडर मध्ये वेगळी पेस्ट करावी. 
  • लसणीच्या ८-१० पाकळ्या ठेचाव्या. आलं ठेचावं. 
  • कढईत भरपूर तेल घ्यावे. नेहमीच्या भाजीच्या दुप्पट! गरम झाल्यावर त्यात अगदी जराशी मोहरी टाकून तडतडल्यावर हिंग, ठेचलेलं आलं आणि ठेचलेली लसूण घालावी.
  • सतत परतावे व तयार केलेली कांद्याची पेस्ट घालावी. १-२ मिनिटे परतल्यावर उरलेले तिखट घालावे आणि पुन्हा परतावे. यानंतर त्यात अर्धा चमचा साखर घालावी त्यामुळे भाजीला चांगला तवंग येतो. 
  • अजून ४-५ मिनिटे परतून टोमॅटो पेस्ट घालावी आणि बाजूबाजूने तेल सुटे पर्यंत ढवळत राहावे. 
  • यात अंदाजे ३ वाट्या पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून उकळावे. 
  • ही भाजी पाण्याइतकी पातळ नसावी. घातलेले पाणी थोडे घट्ट होत आले कि गॅस बंद करावा. 
  • शेव खातेवेळीच घालावी. आधीपासून शेव टाकल्यास तेल शोषून घेते आणि तवंग - तर्री - येत नाही. 
  • shevbhaji-shev-added
  • लिंबू आणि कोथिंबिरीसह पोळी किंवा भाकरी बरोबर खावी. 










Tags: shevbhaji, shevechi bhaji, vidarbha recipes, sevbhaji sev ki subzi, वैदर्भी पदार्थ,


Related Posts:

  • मटार उसळ, Green peas simple veg matar usal, hirvya vatanyachi usal, matarchi bhaji वेळ - १५ मिनिटे  साहित्य: मटार दाणे - २ वाट्या  काळा मसाला  हिरव्या मिरच्या, आलं  ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं  मटार उसळ कशी करावी -कृती: मटार वाफव… Read More
  • झटपट कोफ्ता करी Quick kofta curry Tags: simple kofta curry, quick kofta, zatpat kofta, instant kofta quick simple kofta curry recipe in marathi २५ मिनिटे - ५ जणांसाठी  To read in English : Instant Kofta Curry कोफ्ता करी साहित्य : कोफ्त्यासाठी -… Read More
  • शेवभाजी, Shevbhaji Tags: shevbhaji, shevechi bhaji, vidarbha recipes, sevbhaji sev ki subzi, वैदर्भी पदार्थ, shevbhaji शेवभाजी बनवण्यासाठी कमीतकमी गोष्टी लागतात. कांदा लसूण टोमॅटो शेव बस इतकंच!  विदर्भ प्रांतात प्रामुख्याने केली … Read More
  • कच्च्या टोमॅटोची भाजी, Raw tomatoto vegetable, Green tomato sabji Tags: green tomato subji, raw tomato sabzi subji, hirvya tomatochi bhaji in marathi, kachchya tomatochi bhaji, हिरव्या कच्च्या टोमॅटोची भाजी २० मिनिटे - ४ जणांसाठी   To read in English - Green Tomato Sabzi हिरव… Read More
  • क्रीम पालक , Cream palak, Spinach with cream Tags: palak soup, cream palak creamy spinach recipe in marathi, पालक सूप  साहित्य: पालक - १ जुडी  कांदे - २ लहान  टोमॅटो - अर्धा  ताजे क्रीम - अर्धी वाटी  लोणी - ३ चमचे आलं लसूण पेस्ट, मीठ, मिरप… Read More

1 comment:

  1. Dear Viewers, I would appreciate your view / suggestions on this. TIA

    ReplyDelete

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

522,818

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.