fenugreek curry, dalmethi, methichi amati aamti dalbhaji recipe in marathi
साध्या आमटीत बदल म्हणून ही आमटी करता येईल. कोणतीही पालेभाजी चालेल.मेथीच्या वरणाचे साहित्य:
१ वाटी तुरीच्या डाळीचे वरण - घट्टसर
१ वाटी निवडलेली मेथी - जास्तही चालेल
किंवा
५-६ नसून पाकळ्या
भिजवलेले शेंगदाणे
१ कांदा किंवा कांद्याची पात - ऐच्छिक; नसल्यास हरकत नाही
हिरव्या मिरच्या, गोड मसाला, गूळ,
चिंच किंवा कोकम (आमसूल) किंवा लिंबूरस
नेहमीच्या फोडणीचे साहित्य
डाळमेथीची कृती:
- तुरीच्या डाळीचे घट्ट वरण करावे.
- निवडलेल्या मेथीची पाने धुवून बारीक चिरावीत.
- कढईत किंवा पातेल्यात फोडणीस तेल घ्यावे. त्यात मोहरी, जिरं, मिरचीचे तुकडे, शेंगदाणे घालावेत. आलं-लसूण पेस्ट घालावी; किंवा लसणीच्या ४-५ पाकळ्या ठेचून घालाव्यात.
- आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा किंवा पात घालावी. थोडे परतल्यावर हिंग हळद घालावे.
- बारीक चिरलेली मेथी घालूनि व्यवस्थित परतल्यावर वरण घालावे व ढवळावे.
- बसेल इतपत पाणी, मीठ, गोडा मसाला, गूळ घालावा. धणेजिरे पूड घालावी.
- आंबटपणासाठी लिंबूरस किंवा ३ आमसुले किंवा चिंचेचा कोळ घालावा. वरून लसणीच्या १-२ पाकळ्या ठेचून घातल्या तरी चालेल.
- नीट उकळू द्यावे.
थोडे जास्तीचे
काहीजण या तयार मेथीच्या आमटीवर खाते वेळी परत एकदा वरून जिरं हिंग तिखटाची फोडणी घालतात. तेल जास्त जाते पोटात; पण चव छान येते.
याच प्रकारे पालकाचीही आमटी करू शकतो.
तुरीची डाळ व चिरलेला पालक किंवा मेथी आणि शेंगदाणे एकाच भांड्यात कुकरमध्ये शिजवल्यास वेळ आणि तेल दोन्ही कमी लागते. २ लसूण पाकळ्या त्यांचबरोबर टाकाव्या.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.