aloo tikki, potato pattice batata patis simple pattice batatyache patties street food mumbai chat
साहित्य:
बटाटे - ४ मध्यम
लसूण आलं लिंबू
कोथिंबीर
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर
ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी / कॉर्नफ्लोर / ब्रेडचे स्लाइस - यांपैकी काहीतरी एक
बारीक रवा - २ मोठे चमचे
कृती:
- बटाटे मऊ उकडावेत व साले काढून मॅश करावेत.
- ग्राईंडरमधून आलं-लसूण-जिऱ्याची पेस्ट करावी.
- मॅश केलेल्या बटाट्यात ही पेस्ट, तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर व लिंबू घालून हाताने नीट एकजीव करावे.
- या मिश्रणाचे चपटे गोळे करायचे आहेत. आकार नीट व्हावा यासाठी ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी / कॉर्नफ्लोर यापैकी कोणतीही एक गोष्ट लागते. पण जर यापैकी काहीच न घालताही आकार नीट गोल होत असेल व चिकटत नसेल तर घालू नये.
- आधी हाताला तेल लावावे आणि एक एक भाग मिश्रण घेऊन त्यात वरील पैकी एक गोष्ट मिसळून गोल चापट आकार द्यावा.
- हे गोळे बारीक रव्यात घोळवावेत.
- पसरट तव्यावर किंवा फ्रायपॅनमध्ये शॅलोफ्राय करावे, आधी पॅनला तेल लावून पॅटीस ठेवावे. जरा वेळाने उलटवावे. बारीक रव्यामुळे क्रिस्पी सोनेरी होते.
ही पॅटीसची बेसिक पद्धत आहे. उकडलेल्या बटाट्याऎवजजी बटाट्याची भाजी (उरलेली किंवा केलेली 😎) वापरून पॅटीस करता येते.
खजुराच्या चटणीसोबत व तिखट चटणीसोबत खावे.
बटाट्याचे स्टफ्ड पॅटीस करण्यासाठी लिंकवरची पोस्ट वाचावी.
खजुराच्या चटणीसोबत व तिखट चटणीसोबत खावे.
बटाट्याचे स्टफ्ड पॅटीस करण्यासाठी लिंकवरची पोस्ट वाचावी.
मटार पॅटीस
पोह्यांचे पॅटीस
मक्याचे पॅटीस
भारी👌👌
ReplyDeleteसोपे वाटतात पण करून बघायला हवेत.छान झटपट रेसीपी आहे.
ReplyDeleteबटाटा पॅटीस अगदीच सोपे आहेत. नक्कीच करून पहा. पिझ्झाचे जे seasoning असतं ना ते घातलं तर मस्त चटकमटक होतील.
Delete