Lasanichi chatani lasnichi chatni Garlic chutney lasun chatani recipe in marathi

लसणीची चटणी टिकाऊ, करायला अतिसोपी आणि चविष्ट असते. भाजी आमटीत लसणीऐवजी लसूण चटणी घातली तरी निराळाच स्वाद येतो. 
लसूण चटणी ओल्या खोबऱ्याची आणि सुक्या खोबऱ्याची अशी २ प्रकारे करता येते. 
ओल्या खोबऱ्याची लसूण चटणी अगदी २ मिनिटात झटपट होणारी आहे. पण ओलं खोबरं असल्याने २-३ दिवसच टिकते. खाली लिहिलेली चटणी सुकं खोबरं असल्याने कितीही दिवस टिकते. 


लसणीच्या चटणीचे साहित्य:

लसूण पाकळ्या - १२-१५
तीळ -  पाव वाटी 
सुक्या खोबऱ्याचा कीस - पाव वाटी 
दाण्याचं कूट - पाव वाटी 
तिखट - ३ चमचे 
मीठ, हिंग, चिंच

लसूण चटणीची कृती:

  • तीळ व सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. 
  • लसूण ग्राइंडर मधून फिरवावी. त्यात भाजके तीळ, भाजलेलं खोबरं आणि दाण्याचं कूट घालून थोडं परत वाटावे. 
  • तिखट, मीठ, जरासा हिंग आणि आंबटपणासाठी चिंचोके नसलेली चिंच ग्राईंडरमधे घालून सर्व वाटून एकजीव करावे. 
  • तेल सुटू लागले कि थांबावे. 
भाकरी बरोबर चांगली लागते लसूण चटणी. फोडणीत लसूण ऐवजी लसूण चटणी घालता येते. 
ओलं खोबरं वापरून लसूण चटणी अगदी झटकन करता येते पण पद्धत थोडी वेगळी आहे. 

Related Posts:

  • लसूण चटणी प्रकार १ Garlic Chutney Type 1 Lasanichi chatani lasnichi chatni Garlic chutney lasun chatani recipe in marathi लसणीची चटणी टिकाऊ, करायला अतिसोपी आणि चविष्ट असते. भाजी आमटीत लसणीऐवजी लसूण चटणी घातली तरी निराळाच स्वाद येतो.  लसूण चटणी ओल्या खोबऱ्याच… Read More
  • लिंबू लोणचे - साधे बिनउपवासाचे, Lemon Pickle Tags: Common lemon pickle limbache lonache limbu lonche recipe in marathi, लिंबाचे साधे लोणचे, लिंबलोणच्याची रेसिपी  लिंबाच्या लोणच्याचे साहित्य: ५ डझन लिंबे  ६ चमचे मेथीदाणे - तळून पूड  २ वाट्या तिखट - तेला… Read More
  • उडदाचे डांगर, Urad dal chatani Dangar Tags: udadache dangar, urad dal chutney, udid dalichi chatni उडदाचे डांगर बनवून ठेवले तर पुष्कळ दिवस टिकते आणि पाहिजे तेव्हा पटकन बनवता येते. तेव्हा करण्यास फक्त दोन मिनिटे पुरेशी होतात.  English version avai… Read More
  • कांदा लसूण मसाला, Kanda Lasun Masala Tags: onion garlic masala, kanda lasun masala, कांदा लसूण मसाला, onion masala, kandyacha masala, homemade subji masala, vegetable spices, everyday masala, bhajicha masala, sabji masala sabzi कांदा लसूण मसाला शक्यतो फ्र… Read More
  • उसळ मसाला, Usal masala how to make usal masala at home usalicha masala विविध कंपन्यांचे उसळ मसाले बाजारात विकत मिळतात. परंतु भेसळीची किंवा चांगले वाईट पारखून न घेता सरसकट सामग्री वापरून केले जात असण्याची शक्यता असतेच. त्यासाठी घरीच उसळ मसाला करणे… Read More

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

518,725

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.