stuffed aloo tikki, batatyache stuffed pattice, stuffed potato pattice, batata patties patis, street food mumbai chat

साहित्य:

बटाट्याचे साधे पॅटीस बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य↴
  बटाटे - ४ मध्यम
  लसूण आलं लिंबू
  कोथिंबीर
  तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर


  ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी / कॉर्नफ्लोर / ब्रेडचे स्लाइस - यांपैकी काहीतरी एक
  बारीक रवा - २ मोठे चमचे

सारणासाठी खोबरं कोथिंबिरीची चटणी 

कृती:

  • बटाटे मऊ उकडावेत व साले काढून मॅश करावेत. 
  • ग्राईंडरमधून आलं-लसूण-जिऱ्याची पेस्ट करावी.
  • मॅश केलेल्या बटाट्यात ही पेस्ट, तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर व लिंबू घालून हाताने नीट एकजीव करावे. 
  • आधी हाताला तेल लावावे आणि एक एक भाग मिश्रण घेऊन त्यात वरील पैकी एक गोष्ट मिसळून गोल चापट आकार द्यावा.
सारणाची कृती: 
पॅटीसची कृती:
  • मगाशी केलेल्या त्या चपट्या गोळ्यांमधे वरील पैकी कोणतेही एक सारण भरावे. आणि हाताने गोल वळवत हलकासा दाब देऊन परत चपटे करावे. 
  • हे गोळे बारीक रव्यात घोळवावेत. पसरट तव्यावर किंवा फ्रायपॅनमध्ये शॅलोफ्राय करावे. 
  • आधी पॅनला तेल लावून पॅटीस ठेवावे. जरा वेळाने उलटवावे. बारीक रव्यामुळे क्रिस्पी सोनेरी होते.
मिश्रणाच्या चपट्या गोळ्यांचा आकार नीट व्हावा यासाठी ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी / कॉर्नफ्लोर यापैकी कोणतीही एक गोष्ट लागते. पण जर यापैकी काहीच न घालताही आकार नीट गोल होत असेल व चिकटत नसेल तर घालू नये. 
खजुराच्या चटणीसोबत व तिखट चटणीसोबत खावे.

batatyache bharlele patis, potato pattice aaloo tikki aloo patties
stuffed pattice opened
batatyache bharlele patis, potato pattice aaloo tikki aloo patties
Stuffed pattice











0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.