Tags: ragi pancake healthy breakfast for kids food nachani nachni nachniche pancake dhirde
नाचणीत भरपूर कॅल्शियम असते. कोकण मुंबई भागात विनासायास उगवणारी नाचणी किंवा रागी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वाना उपयुक्त आहे.नुकतंच बाहेरचं खाणं सुरु झालेल्या काही महिन्यांच्या बाळाला नाचणीचे सत्व देतात. नाचणीचे पापड, नाचणीच्या भाकऱ्या, नाचणीचे लाडू, नाचणीचे धिरडे/घावन असे एक ना अनेक प्रकार आहेत.
नाचणीच्या सगळ्या पाककृती "नाचणीचे पदार्थ" इथे लिहिल्या आहेत.
आता नाचणीपासून बनवलेला गोड पदार्थ पाहू. मी या पदार्थाला डोराकेक म्हणते आणि लहान मुलं तो आवडीने खातात.
अगदी झटपट २-३ मिनिटांत तयार होतो.
नाचणीच्या पॅनकेकचे साहित्य :
नाचणीचे पीठपीठीसाखर
दूध
मध
नाचणीच्या गोड धिरड्याची कृती :
- नाचणीचे पीठ आणि पीठीसाखर समप्रमाणात घ्यावे.
- त्यात अंदाजे dropping consistency येईपर्यंत दूध घालावे. मिश्रण पळीवाढ पाहिजे अगदी पातळ नसावे. डोसा करतो त्यापेक्षा जरा घट्ट.
- नीट ढवळून सगळ्या गुठळ्या मोडाव्यात.
- तवा किंवा फ्राय पॅन गरम करून त्यावर एका पळीने हे मिश्रण ओतावे.
- साधारण ३ ते ४ इंच diameter चा गोल होईपर्यंत ओतावे. डोश्यासारखे पसरू नये. तसेच जाड राहू दे.
- एक दोन मिनिटांत त्यावर हवेचे बुडबुडे वर येऊन फुटून जाळी पडेल. याचा अर्थ एक बाजू भाजली गेली आहे. मग सावकाश उलटवावे. दोन्ही बाजू भाजल्या गेल्या की खाली काढावे.
- नाचणी मुळात गडद रंगाची असते. त्यामुळे या पदार्थालाही असाच गडद रंग येतो.
- प्लेटमध्ये या पॅन केकवर भरपूर मध ओतावा आणि गरम असतानाच खावे.
Ragi pancakes with honey |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.