matakichi usal, matkichi bhaji, sprouted moth sabji, moth sabzi

मिसळीसाठी मटकीची उसळ करायची असल्यास करण्याची पद्धत जरा बदलते. 
ती पद्धत मिसळीसाठी उसळ इथे दिली आहे. 

मोड येण्यास वेळ - १४ तास 
करण्यास वेळ - २० मिनिटे 
मोड आलेली मटकी हवाबंद डब्यात फ्रिजमधे ५-६ दिवस टिकते. 

साहित्य:

मटकी - २ वाट्या (२ मोठ्या वाट्या ३-४ जणांना पुरतात)
ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं 
कांदा - १
टोमॅटो - ऐच्छिक १
भिजवलेले शेंगदाणे - ऐच्छिक अर्धी वाटी 

गोडा मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला 

कृती:

  • मटकी निवडून धुवून भिजत ठेवावी. साधारण ६ तास भिजल्यानंतर फुगते. पाणी काढून फडक्यात बांधून ठेवावी. विणलेल्या टोपलीत भिजलेली मटकी न बांधता ठेवली आणि ते टोपले बंद मायक्रोवेव्ह मध्ये नुसते ठेवून दिले - अर्थात उन्हाळी वातावरणात - तरी मोड येतात. 
  • काहीजण मटकी भिजत ठेवताना चमचाभर मेथीदाणे त्यातच भिजवतात. 
  • मोड आलेली मटकी हलकेच धुवून कुकरमध्ये जास्त पाण्यात वाफवावी. एक शिट्टी झाल्यावर लगेच वाफ मोकळी करून झाकण काढावे म्हणजे दाणे अख्खे राहतील. 
  • मटकी शिजवलेले पाणी फेकू नये. ते उसळीत घालता येते किंवा त्याचे कळण बनवता येते. हे कळण खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे. रेसिपी कडधान्यांचे कळण इथे दिली आहे. 
  • कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरावे. आले लसूण ठेचावी. जिरे, मिरची, ओले खोबरे आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवावी. 
  • कढईत तेल गरम करून नेहमीची मोहरी+जिरं+हिंग+हळदीची फोडणी करावी. वाटणातील मिरच्या जास्त तिखट नसतील तर फोडणीत किंचित तिखट घालावे. 
  • काळा मसाला टाकावा. कांदा-लसूण मसाला किंवा उसळ मसाला घालूनही चविष्ट लागते. 
  • आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतावा. 
  • वाटलेला मसाला फोडणीत घालून लगेचच शिजवलेली मटकी फोडणीस टाकावी. फोडणी आणि मसाला सर्व दाण्यांना लागला पाहिजे असे ढवळावे.
  • २ मिनिटे झाकण ठेऊन एक वाफ आणावी. नंतर दीड वाटी पाणी अंदाजाने टाकावे. 
  • मीठ, धणे जिरे पावडर घालावी. चिंचोक्याएवढा गूळ घालावा. 
तीळकूट घरी असल्यास या उसळीत पाणी घालून शिजवताना चमचाभर टाकावे. त्यामुळे चव तर मस्त येतेच पण रसाला घट्टपणाही येतो. 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.