Tags: Tandulachi ukad tandalachi ukadpendi recipe in marathi
तांदुळाची उकडपेंडी म्हणजे चविष्ट आणि झटकन होणारी उपम्यासारखी पाककृती आहे.

तांदळाच्या उकडीचे साहित्य :

तांदुळाचे पीठ - २ वाट्या
ताक किंवा दही - दीड वाटी
आलं
मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता
नेहमीप्रमाणे तेलाची फोडणी

मीठ साखर
कांदा, कांदापात, लसूण - आवडत असल्यास

तांदुळाच्या उकडीची कृती :

  • कढईत तेल गरम करून मोहरी+जिरं+हिंग+हळद फोडणीस घालावे. हळद थोडीशी जास्त. 
  • फोडणीत आलं, मिरच्या, कढीपत्ता घालावा. लसूण/कांदा घालायचा असेल तर याच वेळी फोडणीत घालून परतून घ्यावे. 
  •  दह्याचे ताक करून मिरच्या कढीपत्ता तडतडल्यावर त्यात घालावे. आणि ढवळावे. 
  • सतत ढवळले नाही तर ताक फाटते. 
  • ताकातच मीठ, १ चमचा साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. धणेजिरे पावडर असल्यास घालावी. 
  • उकळी आल्यावर त्यात थोडे थोडे तांदुळाचे पीठ भुरभुरवून टाकावे. लगेचच ढवळून पीठ आणि ताक एकजीव करावे. पांढरे पीठ दिसता काम नये. 
  • पीठ घालणे आणि ढवळणे एकदमच करावे. 
  • २ मिनिटे ढवळून कढईत थोडा चिकट गोळा तयार झाला कि २-३ मिनिटे झाकण ठेवून वाफवावे. 
  • नंतर गॅस बंद करून एकदा उकड वरखाली करावी म्हणजे चिकटणार नाही आणि परत ४-५ मिनिटे नुसतेच झाकण ठेवावे. 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.