अगदी ३-४ मिनिटांत होणारी पाककृती आहे.
साहित्य:
हिरव्या मिरच्या - ५-६
जिरेपूड, मीठ, किंचित साखर
हिंग
दही
कृती:
- गॅसवर मिरच्या भाजाव्यात. इतर पदार्थ करताना भांड्याखाली आचेवर भाजाव्यात. मधेमधे फिरवाव्या म्हणजे जळत नाहीत.
- काळे ठिपके पडू लागले सर्व बाजूनी कि बाहेर काढाव्या.
- तिखटपणा भाजल्याने जरा कमी होतोच; पण अगदीच नको असेल तरच बिया काढाव्यात.
- खलबत्त्यात या भाजक्या मिरच्या ठेचाव्या. थोडे मीठ आणि (दही गोड नसेल तर)अगदी चिमूटभर साखर घालावी.
- हा ठेचा दह्यात घालून जिरं व हिंग यांसोबत कालवावा. सायीचे दही चमचाभर घातल्यास खूपच छान चव येते.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.