upwasachi danyachi amati shengdanyachi amti shengdanyachya kutachi aamati

आंबट गोड चवीची दाण्याची आमटी उपवासाला भगरीबरोबर म्हणजेच वरी तांदुळाच्या भातासोबत खातात. 

साहित्य:

दाण्याचे कूट - अर्धी वाटी 
तिखट, मीठ 
पाणी 
चिंच किंवा आमसुले 
गूळ - चिंचेइतका
फोडणीसाठी तूप, जिरे  

कृती:

  • ग्राइंडरमधे दाण्याचे कूट, जिरं, तिखट यांची घालून पातळ पेस्ट करायची. 
  • पातेल्यात तूप गरम करून जिऱ्याची फोडणी द्यावी. मिरच्यांची गरज नाही. 
  • केलेली पेस्ट फोडणीत टाकून पटापट ढवळावे आणि पाणी घालावे. 
  • चिंचेचा कोळ करून घालावा. किंवा आमसुले वापरायची असतील तर तशीच १०-१२ आमसुले टाकावी. 
  • आमसुलांपेक्षा कोकम आगळ वापरलं तर रंग छान येतो. एक चमचा पुरे होतं. 
  • मीठ आणि गूळ घालावा. 
  • भरपूर उकळावी ही आमटी. पण उकळताना ढवळत राहावे. पटकन उतू जाते. 

कृती २:

  • दाण्याचे कूट, जिरं, तिखट यांची पातळ पेस्ट थोडे अजून पाणी घालून गॅसवर उकळत ठेवावी.
  • त्यात मीठ, गूळ घालावा. चिंचेचा कोळ किंवा आमसुले किंवा कोकम आगळ घालावे. 
  • एका कढल्यात तूप जिऱ्याची फोडणी करावी. 
  • उकळून एकजीव झाले की हि फोडणी त्यावर टाकून थोडे अजून उकळावे. 
अगदीच वेळ कमी असेल तर सध्या पाण्यात दाण्याचे कूट, जिरं, तिखट पेस्ट न करता घालावे. आणि वरील पैकी एका पद्धतीने उपासाची दाण्याची आमटी करावी. 

Peanut Groundnut curry for fast danyachi amti shengdanyachi danyachya kutachi dankutachi aamti
Upvasachi amati






0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.