instant rawa appe recipe in marathi rava appe, ravyache appe
१० मिनिटेइन्स्टंट अप्पे साहित्य:
रवा - २ वाट्यादही - २ चमचे
तेल
मीठ मिरपूड
मिरच्या
रव्याचे अप्पे कृती:
- २ वाट्या रवा, दही एकत्र करून मावेल इतके पाणी घालावे. Dropping consistency असावी.
- यात तेल आणि मीठ घालून आप्प्यांचे बेसिक मिश्रण तयार करून घ्यावे. गुठळ्या नकोत.
- तिखटपणासाठी आवडी प्रमाणे मिरपूड, लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावे.
- Semi boiled भाज्या → टोमॅटो, गाजराचे छोटे तुकडे, मटार, बीटाचा अगदी छोटासा तुकडा, कांदा किंवा कांदापात इ → भाज्या या मिश्रणात टाकूनही वेगळाच रंग आणि चव येते.
- कोथिंबीर चिरुन घालावी.
- आप्पेपात्र तेल लावून मंद गॅसवर ठेवावे. त्यात चमच्याने मिश्रण फक्त अर्ध्यापर्यंत घालावे.
- झाकण ठेऊन २ मिनिटाने उघडावे. आप्पे कडेने सोडवून उलटावे. किंचित तेल लावून २ मिनिटे अजून शिजू द्यावेत. सोनेरी रंगाचे करावेत.
थोडे महत्वाचे:
शक्यतो सोड्याची गरज लागत नाही. पण मग दही आंबट असावे आणि १५ मिनिटे मिश्रण ठेवावे (standing time).
सोडा घातल्यास (अगदी चिमूटभर) standing time आवश्यक नाही. लगेच गॅसवर ठेवावे.
आप्पे गरमच चांगले लागतात. कोणत्याही चटणीबरोबर खावेत. इडलीच्या चटणीबरोबर खूपच छान लागतात.
Basic Appam without any veggies |
Nice recipe
ReplyDeleteHi, Ravyache appe karun paha aani mast kha. Mag sanga kase zale te aani kahi improvements astil tar :)
Delete