Tags: Lemon Chatni, Chutney, Lemon juice recipe, Limbu chatani, Limbacha ras
ही एक मस्त चटकमटक रेसिपी आहे. मला लिहितानाच खावीशी वाटत आहे. याचे नाव 'लेमोसा' कसे आले माहित नाही. आईनी म्हटले मग मी म्हटले. लिंबाच्या रसाची चटणी असं पण नाव देता येईल.
साहित्य:
लिंबूरस - १ वाटीसाखर - अर्धी वाटी
मीठ, तिखट, मेथीदाणे
फोडणीचे सामान
कृती:
- लिंबाचा अंदाज देता येत नाही कारण सर्व लिंबांत सारखा रस नसतो. एक वाटी लिंबूरस काढून घ्यावा.
- त्यात अर्धी वाटी साखर आणि २ चमचे मीठ घालून विरघळण्यास ठेवावे.
- अंदाजे मिठाचे प्रमाण कमी जास्त होईल. साखर विरघळायला वेळ लागतो.
- बऱ्यापैकी विरघळत आली कि त्यावर दोन अडीच चमचे लाल तिखट घालावे. लाल तिखट वर तरंगेल ते चमच्याने अजिबात ढवळू नये. तसेच वर राहू द्यावे.
- छोट्या कढल्यात तेल+मोहरी+मेथीचे ८-१० दाणे+जिरे+हिंग+अगदी थोडी हळद यांची खमंग फोडणी करून ती त्या तिखटावर ओतावी.
- चुर्रर्र आवाज येऊन मस्त वास येतो. मग ढवळावे. मीठ साखर तिखट फोडणी एकजीव करावी.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.