singhada halwa shingadyacha pithacha sheera shingadyacha shira

शिंगाड्याचे पीठ विकत मिळते. त्यापासून उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनावट येतात. शिंगाड्याचे पीठ घरीच बनवले तर जास्त स्वस्त आणि शुद्ध होते. यासाठी कोरडे शिंगाडे आणून साल काढून मिक्सरमधे फिरवावेत. आवाज खूप होतो. पण घरीच चांगले पीठ मिळते. 
शिऱ्याप्रमाणे शिंगाड्याच्या पिठाची खीरदेखील बनवू शकतो. 
शिरा करण्यास वेळ - ५ मिनिटे 

शिंगाड्याच्या हलव्याचे साहित्य:

तूप - २ टेबलस्पून 
शिंगाडा पीठ - १ वाटी 
दूध - अर्धी वाटी 

साखर - पाव वाटीपेक्षा किंचित जास्त 
वेलचीपूड, जवळ असलेला सुकामेवा 

शिंगाड्याच्या शिऱ्याची कृती:

  • कढईत तूप गरम करून त्यावर शिंगाड्याचे पीठ परतून घ्यावे. 
  • साधारण २-३ मिनिटे परतल्यावर गोडुस वास येऊ लागेल. 
  • या परतलेल्या पीठावर थोडे थोडे दूध सोडून सतत परतत राहावे. यामुळे पीठ फुलते. पाण्यापेक्षा दूध वापरल्याने चविष्ट लागते. 
  • वरून साखर घालून पुन्हा ढवळावे. साखरेमुळे थोडा ओलसरपणा येईल. 
  • झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजू द्यावे. शिंगाड्याचे पीठ पटकन करपते त्यामुळे सारखे ढवळत राहणे गरजेचे आहे. 
  • गॅस बंद करून त्यात वेलची पूड घालून ढवळावे आणि आवडेल तो सुका मेवा, बदाम काजू अक्रोड पिस्ता, घालावा. 
  • झाकण बंद करून २ मिनिटे तसेच ठेवावे. आणि पोटभर खावे. 
I happily welcome all your views, opinions, suggestions in the comment below. That would help me to make singhada recipe better. TIA. Cheers.
Shingadyacha shira halwa singhada flour halva
Shingada shira

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.