Tags: कैरीचं रायतं, मेथांबा, कोयाडं, कैरीची चटणी, Methamba, kairi raita, koyada, raw mango chatani
English version available at -
Methamba, Koyada, Raw mango raita recipe in english
कैरीच्या रायत्याचे साहित्य :
कैऱ्या - ४
गूळ - पाऊण वाटी (कैरीच्या आंबटपणानुसार)
तिखट, मीठ,
मेथीदाणे - १ tsp
तेल, जिरे, हिंग, हळद
मेथांब्याची कृती :
- कैऱ्या स्वच्छ धुवून कुकरमधे उकडाव्या.
- उकडल्यावर कैऱ्यांची सालं सोलून काढून टाकावी.
- एका मोठ्या भांड्यात कैरीचा सर्व गर काढून घ्यावा. सालीला लागलेला गरदेखील चमच्याने काढावा.
- या गरात चिरलेला गूळ घालून २० मिनिटे बाजूला ठेवावे. गूळ विरघळला की मीठ घालून ढवळावे.
- यावर चवीनुसार १ किंवा २ चमचे तिखट घालावे. पण नंतर ढवळू नये.
- छोट्या कढल्यात तेल गरम करून मेथीचे दाणे घालावेत. मोहरी, जिरं, हिंग, हळदीची फोडणी करून ती फोडणी तिखटावर सर्वबाजूनी ओतावी.
- नंतर व्यवस्थित एकजीव करावे.
मेथांबा तयार झाला. कैऱ्या जास्त आंबट नसतील तर गूळ जरा कमी करावा.
याची चव साधारण आंबट गॉड व किंचित तिखट असते.
यालाच कैरीचं रायतं, कैरीचं कोयाडं किंवा मेथांबा अशी बरीच नावं आहेत.
To read in english, click Methamba, Koyada, Raw mango raita recipe in english
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.