variche tandul, vari tandulacha bhat bhagar varichya tandulachi khichadi
वरीचे तांदूळ उपासाला भातासारखे केले जातात. पटकन होतात, पोटभरीचे आणि चांगले लागतात.एक वाटी वरी घेतली तर २ किंवा ३ जणांना पुरेल इतका भात होतो.
वरी तांदुळाला भगर म्हणतात.
साहित्य:
वरी तांदूळ - १ वाटीदाण्याचे कूट - पाव वाटी
पाणी - दुप्पट आणि थोडे जास्त
साखर - १ टीस्पून
तूप, जिरं, मिरच्या, मीठ
आलं, शेंगदाणे,
भाज्यांपैकी - बटाटे, लाल भोपळा, सुरण, काकडी - जे चालत असतील ते
कृती:
- बटाटे, लाल भोपळा, सुरण यांच्या साले काढून फोडी कराव्यात.
- शेंगदाणे अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवावेत.
- कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात जिरे, आलं आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात.
- चमचाभर साखर घालावी. यामुळे भगर मऊ होते आणि चव चांगली येते.
- यानंतर चिरलेल्या भाज्या आणि शेंगदाणे घालून २-३ मिनिटे झाकण ठेवावे.
- वरी घालून १-२ मिनिटे परतावी.
- दाण्याचं कूट घालून परतावे.
- आधणाचं पाणी, आणि मीठ घालून ढवळून घ्यावे.
- भगरीत भरपूर पाणी सामावते.
- झाकण ठेवून शिजवून घावी; झाकण ठेवला नाही तर शिजताना ती थेंब थेंब बाहेर उडते.
- भंगार पूर्ण शिजत आली कि उतरवताना काकडीचे तुकडे घालावेत.
- ज्यांना उपवासाला कोथिंबीर चालत असेल त्यांनी अवश्य घालावी.
यात लाल तिखट घातल्यावर लालसर रंग येतो. पण ते तुपाच्या फोडणीत घालू नये. पाणी घातल्यावर मग टाकावे. एक आमसूल टाकले तर रंग सुंदर येतो.
ही भगर दाण्याच्या आमटीसोबत खातात. उपवासाची कोथिंबिरीची चटणी घेऊनही खाता येते. किंवा उपवासाची हिरव्या मिरच्यांची कोरडी चटणी सोबत खावी.
Bhagar |
Vari Tandul |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.