Tuesday, February 21, 2017

mugachi usal, mugachi bhaji, sprouted moong sabji, mung sabzi

मिसळीसाठी मुगाची उसळ करायची असल्यास करण्याची पद्धत जरा बदलते. 
ती पद्धत मिसळीसाठी उसळ इथे दिली आहे. 

मोड येण्यास वेळ - १६ तास
करण्यास वेळ - २० मिनिटे
मोड आलेले मूग हवाबंद डब्यात फ्रिजमधे ५-६ दिवस टिकतात.

साहित्य:

मूग - २ वाट्या (२ मोठ्या वाट्या ३-४ जणांना पुरतात)
ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं
कांदा - १

टोमॅटो - ऐच्छिक १
भिजवलेले शेंगदाणे - ऐच्छिक अर्धी वाटी
गोडा मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला 

कृती:

  • हिरवे मूग निवडून धुवून भिजत ठेवावे. साधारण ६ तास भिजल्यानंतर फुगतील. पाणी काढून फडक्यात बांधावे. विणलेल्या टोपलीत भिजलेले मूग न बांधता ठेवले आणि ते टोपले बंद मायक्रोवेव्ह मध्ये नुसते ठेवून दिले - अर्थात उन्हाळी वातावरणात - तरी मोड येतात. 
  • मोड आलेले मूग हलकेच धुवून कुकरमध्ये जास्त पाण्यात वाफवावे. एक शिट्टी झाल्यावर लगेच वाफ मोकळी करून झाकण काढावे म्हणजे दाणे अख्खे राहतील. 
  • मूग शिजवलेले पाणी फेकू नये. ते उसळीत घालता येते किंवा त्याचे कळण बनवता येते. हे कळण खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे. रेसिपी कडधान्यांचे कळण इथे दिली आहे. 
  • कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरावे. आले लसूण ठेचावी. जिरे, मिरची, ओले खोबरे आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवावी. 
  • कढईत तेल गरम करून नेहमीची मोहरी+जिरं+हिंग+हळदीची फोडणी करावी. वाटणातील मिरच्या जास्त तिखट नसतील तर फोडणीत किंचित तिखट घालावे. 
  • काळा मसाला टाकावा. कांदा-लसूण मसाला किंवा उसळ मसाला घालूनही चविष्ट लागते. 
  • आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतावा. 
  • वाटलेला मसाला फोडणीत घालून लगेचच शिजवलेले मूग फोडणीस टाकावे. फोडणी आणि मसाला सर्व दाण्यांना लागला पाहिजे असे ढवळावे.
  • २ मिनिटे झाकण ठेऊन एक वाफ आणावी. नंतर दीड वाटी पाणी अंदाजाने टाकावे. 
  • मीठ, धणे जिरे पावडर घालावी. चिंचोक्याएवढा गूळ घालावा. 
तीळकूट घरी असल्यास या उसळीत पाणी घालून शिजवताना चमचाभर टाकावे. त्यामुळे चव तर मस्त येतेच पण रसाला घट्टपणाही येतो. 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

Popular Posts

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.