Tags: Nachanich ghavan nachniche dhirade ragi quick dosa finger millet flat pancake
अगदी झटपट आणि पौष्टिक अशी ही पाककृती आहे.नाचणीच्या धिरड्याचे साहित्य :
नाचणीचे पीठ - १ वाटीबारीक रवा - २ टेबलस्पून
दही किंवा ताक - पाव वाटी / २ टेबलस्पून
तेल - १ चमचा
तिखट मीठ हिंग हळद धणेजिरे पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची,
आलेलसूण पेस्ट, कांदा - आवडत असल्यास
नाचणीच्या घावनाची कृती :
- एका मोठ्या बाऊलमध्ये नाचणीचे पीठ घेऊन त्यात बारीक रवा, तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर घालावे.
- हलकेच एकत्र करून त्यात दोन चमचे दही किंवा आंबट ताक घालावे आणि ढवळावे.
- रव्यामुळे आणि दह्यामुळे धिरड्याला सुंदर जाळी पडते.
- दह्याचे प्रमाण कमी केले तरी हरकत नाही. अजिबात न घालताही छान घावन होतात.
- या मिश्रणात हळू हळू पाणी घालत ढवळावे. गुठळ्या लगेचच मोडाव्या.
- अगदी पातळ करू नये. डोसे करतो त्यापेक्षा जरासे पातळ चालेल.
- नंतर चमचाभर तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. काही जणांना कच्च्या मिरच्या आवडतात. तेव्हा लाल तिखटाऐवजी कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे मिश्रणात घातले तरी चालतील.
- बारीक चिरलेला कांदा आणि/किंवा आलेलसणीची पेस्ट घालता येईल.
- मिश्रण तयार झाले कि सतत हलवत राहावे अन्यथा नाचणी खाली बसते.
- ताव गरम करून त्यावर पळीने पीठ गोलाकार ओतावे. डोशासारखे पसरवू मात्र नये.
घावन पातळ करावे. जाडे केल्यास कधी कधी नाचणी कच्चीच राहते.
nachniche dhirde ghavan |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.