Lasanichi chatani lasnichi chatni Garlic chutney lasun chatani recipe in marathi
Instant garlic chatni |
ओल्या खोबऱ्याची लसूण चटणी अगदी दोन मिनिटांत होते. लसूण चटणी ओल्या खोबऱ्याची आणि सुक्या खोबऱ्याची अशी २ प्रकारे करता येते.
सुक्या खोबऱ्याची चटणी कितीही दिवस टिकते. ही चटणी ओलं खोबरं असल्याने २-३ दिवसच टिकते.
लसणीच्या चटणीचे साहित्य:
ओलं खोबरं अर्धी वाटीलसूण पाकळ्या ७-८
तिखट, मीठ
लसूण चटणी कशी करावी - कृती:
- ही चटणी खलबत्त्यातच करावी. ग्राईंडरमधे नीट चव येत नाही.
- लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. त्यातच ओलं खोबरं, तिखट आणि मीठ घालून भरपूर कुटावे.
- कुटून कुटून मिश्रण एकजीव झालं पाहिजे. तिखटाचा लाल रंग आणि खोबऱ्याचा पांढरा रंग एकत्र होऊन या चटणीला हलकासा गुलाबी रंग येतो. खूप सुंदर दिसते. चविष्ट लागते.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.