Tags: nachanichi idli nachni chi idlya ragi idli finger millet idlis
Ragi Idli |
पीठ भिजवून आंबवून त्याच्या इडल्या करता येतात किंवा सोडा घालून इन्स्टंट इडल्या करता येतात.
थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात.
नाचणी मुळातच अतिशय पौष्टिक आहे. नाचणीचे अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक इडली.
नाचणीच्या इन्स्टंट इडल्यांसाठी लिंकवर दुसरी पोस्ट लिहिली आहे. इथे आंबवून केलेल्या पिठाच्या इडल्यांची पाककृती देत आहे. नाचणीच्या इडल्या आणि नाचणीचे डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.
नाचणीच्या इडलीचे साहित्य:
१ वाटी नाचणी पीठ१ वाटी इडली रवा
अर्धी वाटी उडीद डाळ
मीठ, पाणी
फोडणी - ऐच्छिक
नाचणी इडलीची कृती:
- सर्वात आधी इडली रवा आणि उडदाची डाळ पाण्यात वेगवेगळी भिजत ठेवावी. ६ ते ८ तास भिजवली गेली पाहिजे.
- सकाळी भिजत टाकल्यास संध्याकाळी मिक्सरमध्ये बारीक करता येईल.
- रवा, डाळ पेस्ट करण्यास सुरुवात करण्यापूर्वी नाचणीचे पीठ थोड्या पाण्यात भिजत टाकावे. भिजेल इतपतच पाणी ठेवावे,
- इडली रव्यातील जास्तीचे पाणी काढून टाकून ग्राईंडरमधून बारीक पेस्ट करावी.
- उडीद डाळीतील जास्तीचे पाणी काढून त्याचीही मऊसूत पेस्ट करावी. उडीद डाळ मिक्सरमध्ये सलग कधीच फिरवू नये. नेहमी मधे मधे थांबवत पेस्ट करावी. त्यामुळे उडदाला हलकेपणा येतो.
- इडली रव्याची आणि उडदाची पेस्ट मिक्स करून परत एकदा फिरवावे होईल.
- यात भिजवलेले नाचणीचे पीठ जास्तीचे पाणी काढून टाकून घालावे आणि परत एकदा सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. फारच घट्ट वाटत असेल तर किंचित पाणी घालावे.
- हे मिश्रण रात्रभर म्हणजे निदान १२-१४ तास झाकण लावून उबदार जागेत ठेवून द्यावे.
- थंडीच्या दिवसात उशिराने आंबते. मिश्रण फुगून वर येतं त्यामुळे पातेले उंच आणि मोठे असावे.
- असे आंबलेले, फुगून वर आलेले मिश्रण ढवळून घ्यावे. ढवळताना हवेचे छोटे छोटे बुडबुडे बाहेर येतील आणि मिश्रण फाटल्यासारखे वाटेल.
- या मिश्रणात अंदाजे पाणी आणि मीठ घालावे.
- इडली पात्राला तेलाचा हात लावावा. आणि इडलीपीठ घालून १५ मिनिटे वाफवावे.
थोडे विशेष:
काहीजण पिठात जाडे पोहे घालतात. जाडे पोहेसुद्धा रवा, उडीद डाळ यांच्याबरोबर वेगळे भिजवावेत. आणि त्यांचीही पेस्ट करून घ्यावी.
आंबवलेल्या मिश्रणात थोडी तेल+कढीपत्ता+मोहरी+हिंग अशी फोडणी घालून मग इडल्या वाफवल्यास अजून वेगळी चव येते.
इन्स्टंट नाचणी इडलीसाठी लिंकवर पोस्ट वाचावी.
नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीससाठी नाचणीचे पदार्थ इथे क्लिक करा.
नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीससाठी नाचणीचे पदार्थ इथे क्लिक करा.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.