Tags: fermented idli, rice idli, idali, south indian food, इडली, तांदुळाची इडली, idli recipe in marathi

fermented idli, rice idli, idali, south indian food, इडली, तांदुळाची इडली, idli recipe in marathI,
Rice Idli
पीठ भिजवून आंबवून त्याच्या इडल्या करता येतात किंवा सोडा घालून इन्स्टंट इडल्या करता येतात. 
थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात. 

याच आंबवलेल्या पिठापासून डोसेही करतात. 





इडलीचे साहित्य : 

जाडे तांदूळ - ३ वाट्या 
उडीद डाळ - १ वाटी 
मीठ पाणी 

इडल्यांची कृती :


  • जाड तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून वेगवेगळी भिजत टाकावी. २० तास तरी भिजवली जायला हवी. 
  • भिजली गेल्यावर जास्तीचे पाणी काढून टाकावे. 
  • ग्राईंडरमधून तांदूळ आणि डाळ वेगवेगळे बारीक करावे. मऊसूत पेस्ट झाली पाहिजे. 
  • उडदाची डाळ वाटताना मिक्सर मध्ये मध्ये थांबवून वाटली तर छान हलकी होते. 
  • पेस्ट करून झाल्यावर दोन्ही एकत्र करावे आणि परत मिक्सर मधून काढावे. यामुळे एकजीव होईल. 
  • हे मिश्रण मोठ्या भांड्यात झाकण लावून उबदार जागेत ठेवावे. २४ तास झाकावे. 
  • थंडीच्या दिवसात उशिराने आंबते. मिश्रण फुगून वर येतं त्यामुळे पातेले उंच आणि मोठे असावे. 
  • असे आंबलेले, फुगून वर आलेले मिश्रण ढवळून घ्यावे. ढवळताना हवेचे छोटे छोटे बुडबुडे बाहेर येतील आणि मिश्रण फाटल्यासारखे वाटेल. 
  • या मिश्रणात अंदाजे पाणी आणि मीठ घालावे. इडली पात्राला तेलाचा हात लावावा. आणि इडलीपीठ घालून १५ मिनिटे वाफवावे.
तांदुळाच्या ऐवजी इडली रवा घेतला तर भिजवण्याच्या आणि आंबवण्याच्या वेळ बराच कमी म्हणजे ८-९ तास इतकाच होतो. बाकी कृती सारखीच आहे. 
झटकन इडल्यांची कृती इन्स्टंट इडल्या इथे दिली आहे. 

Tags: fermented idli, rice idli, idali, south indian food, इडली, तांदुळाची इडली, idli recipe in marathi

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.