mirchicha thecha hirvya mirchyncha thecha green chilli thecha chatni chutney
साहित्य:
हिरव्या मिरच्या १०-१५लसूण पाकळ्या ७-८
जिरं मीठ लिंबू
फोडणीचं साहित्य
कृती:
- हिरव्या मिरच्या धुवून देठे काढून घ्या. मिरच्यांच्या बिया काढल्याने तिखटपणा थोडा कमी होतो. म्हणून ज्याला कमी तिखट हवे आहे त्यांनी बिया जराश्या काढाव्यात.
- मिरच्यांचे तुकडे करून ग्राइंडरमध्ये लसूण, जिरं आणि मीठ घालून अगदी बारीक वाटून घ्या.
- या मिश्रणावर लिंबू पिळा.
- तेल+मोहरी+हिंग फोडणी करून ती ठेच्यावर ओता आणि नीट ढवळून घ्या.
पोळ्या करून झाल्यावर तव्यावर थोड्या तेलात मिरच्या नुसत्या भाजून त्यांचा असाच ठेचा करता येतो.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.