matar usal, hirvya vatanyachi usal, matarchi bhaji

वेळ - १५ मिनिटे 

साहित्य:

मटार दाणे - २ वाट्या 
काळा मसाला 
हिरव्या मिरच्या, आलं 
ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं 

मटार उसळ कशी करावी -कृती:

  • मटार वाफवून घ्यावेत. शक्यतो राईस कुकर वापरावा. प्रेशर कुकर मध्ये लगदा होतो. मायक्रोवेव्ह मध्ये १ मिनिटांत झटकन शिजतात. उकळत्या पाण्यात ५ मिनिटे उकळवत ठेवले तरी शिजतात. 
  • मटार शिजवताना लोणी चोळून घ्यावे. किंवा चिमूटभर सोडा घालावा. त्यामुळे हिरवा रंग टिकतो. 
  • उकडलेले मटार गार होईस्तोवर हिरव्या मिरच्या, आलं, जिरं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर ग्राइंड करून बारीक वाटण करावे. आवडी प्रमाणे लसणीच्या २-३ पाकळ्या टाकता येतील. 
  • हे वाटण कोमट झालेल्या मटार दाण्यांना हलक्या हाताने लावावे. 
  • नेहमीची तेल+मोहरी+जिरे+हिंग+हळदीची फोडणी करून त्यात हे मटार आणि काळा मसाला घालावा. 
  • अर्धी वाटी पाणी घालावे. ह्या उसळीला अगदी थोडा रस चांगला वाटतो. 
  • शिजल्यावर मीठ आणि लिंबूरस घालून चव वाढवावी. 
कांदा-लसूण मसाला किंवा उसळ मसाला घालूनही चविष्ट लागते. 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.