Tags: rawa idli, instant idli, instant rava idali, semolina idli, ravyachi रव्याची इन्स्टंट इडली,रव्याच्या इडल्या, रवा इडली, रव्याची इन्स्टंट इडली, idli recipe in marathi
Instant Rava Idli |
आंबवून केलेल्या पिठाच्या इडल्यांसाठी लिंकवर दुसरी पोस्ट लिहिली आहे.
इथे झटपट इडल्या कशा करायच्या ते पाहू.
याचप्रमाणे या पिठाचे इन्स्टंट डोसे करता येतात.
इन्स्टंट इडल्या आणि इन्स्टंट डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.
इन्स्टंट रवा इडली साहित्य :
१ वाटी उडीद डाळ
१ वाटी आंबट दही
अर्धा चमचा इनो (फ्रुट सॉल्ट)
मीठ
तेलाची फोडणी - ऐच्छिक
रव्याच्या इन्स्टंट इडलीची कृती :
- अर्धी वाटी उडीद डाळ गरम पाण्यात अर्धा तास भिजवावी.
- बारीक रवा अर्धा तास बेताच्या पाण्यात मिश्रण थलथलीत असावे.
- उडीद डाळ बारीक वाटावी. थांबून थांबून वाटल्याने ती हलकी होते.
- बारीक रवा मिक्सरमध्ये वाटावा.
- उडदाची पेस्ट, रवा, नाचणी एकत्र एकजीव करावे. त्यात वाटीभर आंबट दही आणि अंदाजे मीठ घालून ढवळावे.
- इनो किंवा सोडा यापैकी काहीही एक चालेल. शक्यतो इनोच बरं कारण कधी कधी सोड्याला वास येतो.
- इनो फार जुने नसावे. अर्धा चमचा इनो घालून ढवळल्यावर तेल लावलेल्या इडली पात्रात १५ मिनिटे इडल्या वाफवाव्यात.
- आवडत असल्यास, इनो घालून झाल्यावर, तेल+मोहरी+कढीपत्ता+हिंग अशी फोडणी करून मिश्रणात घालावी.
कोणत्याही चटणीबरोबर या इडल्या छान लागतात.
सुंदर
ReplyDeleteThanks. Instant idli karun paha.
Delete