how to make usal masala at home usalicha masala

विविध कंपन्यांचे उसळ मसाले बाजारात विकत मिळतात. परंतु भेसळीची किंवा चांगले वाईट पारखून न घेता सरसकट सामग्री वापरून केले जात असण्याची शक्यता असतेच. त्यासाठी घरीच उसळ मसाला करणे केव्हाही चांगले. खूप मोठ्या प्रमाणात मसाला करून ठेऊ नये. जॅमच्या लहान बरणीत मावेल इतकाच करावा. त्यामुळे तो विशेष सांभाळावा लागत नाही शिवाय वास चांगला टिकतो. चवीत फेरफार करत राहता येतो. 
करण्यासाठी मोजून १५ मिनिटे लागतात. सर्व प्रकारच्या उसळींसाठी वापरता येतो. 

मसाल्याचे साहित्य:

धणे - १ वाटी 
लाल मिरच्या - १०
खसखस - १ टेबलस्पून 
लवंग, दालचिनी, मिरे, वेलदोडे - प्रत्येकी १० ग्राम 

उसळ मसाल्याची कृती:

  • मंद गॅसवर खसखस कोरडी भाजा. 
  • छोट्या कढईत चमचाभर तेल घेऊन त्यात क्रमाक्रमाने लवंग, वेलदोडे, मिरी, आणि दालचिनीचे तुकडे वेगवेगळे परता. 
  • एकंदर प्रमाण कमी असेल तर हे सर्व ग्राईंडरमधे एकत्रच बारीक वाटा. 
  • जास्त प्रमाण असेल तर वेगवेगळे वाटून नंतर एकत्र वाटा. 
हा मसाला जास्त प्रमाणात केल्यास मीठ आणि हिंग पूड लावून हाताने कालवून काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवावा. मसाल्यातील जिन्नस आधी भाजून तळून घेतलेले असल्याने हा मसाला शक्यतो फोडणीत घालू नये. कडधान्ये फोडणीस टाकल्यावर मग घालावा. 
कोणतीही उसळ करताना हा मसाला वापरता येईल.
उसळींसाठी या मसाल्याप्रमाणे कांदा-लसूण मसालाही घालता येईल. 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.