misalisathi usal, sabji for misal, misal sabzi
चमचमीत मिसळीचा बेस कडधान्ये आणि रस्सा/सॅम्पल हाच असतो.कोणत्याही कडधान्यांची उसळ आपण मिसळ करण्याकरता वापरू शकतो. फक्त करण्याची पद्धत थोडी बदलते आणि तिखट तेज होते. खाली दिलेल्या कोणत्याही उसळी वापरता येतात.
मुगाची उसळ
मटकीची उसळ
चवळीची उसळ
पांढऱ्या वाटण्याची उसळ
कृती:
- प्रत्येक उसळीची कृती त्या त्या पोस्ट मध्ये दिली आहे. इथे फक्त फरक पाहू.
- कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी करावी. ३ कांद्यांना १ टोमॅटो इतकेच प्रमाण असावे.
- लसणीच्या ८-१० पाकळ्या ठेचाव्या. आलं ठेचावं.
- कढईत नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घ्यावे. गरम झाल्यावर त्यात अगदी जराशी मोहरी टाकून तडतडल्यावर हिंग, ठेचलेलं आलं आणि ठेचलेली लसूण घालावी.
- सतत परतावे व तयार केलेली कांद्याची पेस्ट घालावी. १-२ मिनिटे परतल्यावर गरम मसाला, तिखट टाकून पुन्हा परतावे. यानंतर त्यात अर्धा चमचा साखर घालावी त्यामुळे भाजीलातेलाचा तवंग येतो.
- अजून ४-५ मिनिटे परतून टोमॅटो पेस्ट घालावी आणि बाजूबाजूने तेल सुटे पर्यंत ढवळत राहावे.
- केप्रचा उसळ मसाला मिळतो. तो वापरता येईल. उसळ मसाला घालून लगेचच भिजवलेले/मोड आलेले कडधान्य टाकून व्यवस्थित ढवळावे.
- अंदाजे पाणी आणि मीठ घालावे. कोथिंबीर घालावी.
थंड पाणी घातल्यास तेल वर दिसून येते.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.