Tags: Nachanichi instant idli Nachni chi idlya instant ragi idli finger millet quick idlis 

nachni chi idli
Nachani Idli

अचानक इडल्या करायच्या झाल्यास किंचित सोडा किंवा इनो किंवा आंबट दही घालून इन्स्टंट इडल्या करता येतात. परंतु थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात.
नाचणी मुळातच अतिशय पौष्टिक आहे. नाचणीचे अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक इडली.







नाचणीच्या आंबवून केलेल्या पिठाच्या इडल्यांसाठी लिंकवर दुसरी पोस्ट लिहिली आहे. इथे झटपट इडल्या कशा करायच्या  ते पाहू. याचप्रमाणे नाचणीच्या पिठाचे इन्स्टंट डोसे करता येतात. लिंकवर रेसिपी आहे. 
नाचणीच्या इन्स्टंट इडल्या आणि इन्स्टंट डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.

नाचणीच्या इडलीचे साहित्य:

१ वाटी बारीक रवा 
अर्धी वाटी उडीद डाळ 
१ वाटी आंबट दही 
अर्धा चमचा इनो (फ्रुट सॉल्ट)
मीठ 
तेलाची फोडणी - ऐच्छिक 

नाचणीच्या इन्स्टंट इडलीची कृती :

  • अर्धी वाटी उडीद डाळ गरम पाण्यात अर्धा तास भिजवावी. 
  • बारीक रवा अर्धा तास बेताच्या पाण्यात  मिश्रण थलथलीत असावे.
  • उडीद डाळ बारीक वाटावी. थांबून थांबून वाटल्याने ती हलकी होते. 
  • बारीक रवा मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना त्यात नाचणीचे पीठ घालावं. 
  • उडदाची पेस्ट, रवा, नाचणी एकत्र एकजीव करावे. त्यात वाटीभर आंबट दही आणि अंदाजे मीठ घालून ढवळावे. 
  • इनो किंवा सोडा यापैकी काहीही एक चालेल. शक्यतो इनोच बरं कारण कधी कधी सोड्याला वास येतो. 
  • इनो फार जुने नसावे. अर्धा चमचा इनो घालून ढवळल्यावर तेल लावलेल्या इडली पात्रात १५ मिनिटे इडल्या वाफवाव्यात. 
  • आवडत असल्यास, इनो घालून झाल्यावर, तेल+मोहरी+कढीपत्ता+हिंग अशी फोडणी करून मिश्रणात घालावी. 
कोणत्याही चटणीबरोबर या इडल्या छान लागतात. असेच नाचणीचे झटपट डोसेही होतात. 
नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीससाठी नाचणीचे पदार्थ इथे क्लिक करा. 

Tags: Nachanichi instant idli Nachni chi idlya instant ragi idli finger millet quick idlis

1 comment:

  1. Chan aahe recipe. Can I use nachani satv in place of nachani pith and vice versa?

    ReplyDelete

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.