Tags: onion garlic masala, kanda lasun masala, कांदा लसूण मसाला, onion masala, kandyacha masala, homemade subji masala, vegetable spices, everyday masala, bhajicha masala, sabji masala sabzi

कांदा लसूण मसाला शक्यतो फ्रिजमधे ठेवावा. उसळी, कोरड्या भाज्या आणि रसभाज्या करताना हा मसाला वापरता येतो. आवडत असल्यास स्टफ्ड भाज्यांसाठी आणि पालेभाज्यांमध्ये घालू शकतो.
English version at - Onion Garlic Masala, Everyday Masala

सब्जी मसाला, भाजीचा मसाला साहित्य :

कांदे - ६
लसणीचे गड्डे - २ मोठे
गोडा मसाल्याची सगळी सामग्री
आणखी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे
अर्धी वाटी लाल तिखट
२ वाट्या तेल
कोथिंबीर, कढीपत्ता

कांदा लसूण मसाल्याची कृती :

  • गोड्या मसाल्याच्या कृतीप्रमाणे मसाला तयार करावा. 
  • कांद्याचे काप करून कडकडीत उन्हात वाळवावेत. जमल्यास कढीपत्ताही वाळवावा. 
  • कांदा वाळल्यावर ते काप, खोबऱ्याचे तुकडे, लसणीच्या पाकळ्या तेलात तांबूस रंगावर तळाव्या. 
  • तळल्यावर हे जिन्नस वेगवेगळे वाटावे आणि गोडा मसाल्यात घालावेत. 
  • लाल तिखटावर कोथिंबीर आणि कढीपत्ता पसरवून त्यावर मगाचचे तळलेले तेल गरम गरमच ओतावे. 
  • तेल तिखटात मिसळून घेऊन ते तिखटही वरील मसाल्यात घालावे. 
  • सर्व एकत्र करून कांदा लसूण मसाला काचेच्या हवाबंद बरणीत भरून शक्यतो फ्रिजमधे ठेवावा. 
English मध्ये वाचण्यासाठी - Onion Garlic Masala, Everyday Masala

Tags: onion garlic masala, kanda lasun masala, कांदा लसूण मसाला, onion masala, kandyacha masala, homemade subji masala, vegetable spices, everyday masala, bhajicha masala, sabji masala sabzi

1 comment:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.