Tags: Ragi malt for diabetes, nachni satva in curd buttermilk, takatil nachni satva for diabetes baby food

नाचणीचे सत्व कसे करावे याची माहिती लिंकवर आधी वाचलीच असेल. 
घरी करायला जमलं नाही तर बाजारात पोषकचे २ प्रकारचे नाचणी सत्व मिळते. साखरेसह आणि साखरेशिवाय. साखर आणि दूध घालून सत्व करण्याची पद्धत बद्दल आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे . 
दोन्ही प्रकारे चविष्ट आणि अगदी झटपट पदार्थ करता येतात. मधुमेही व्यक्तींनी शक्यतो बिना साखरेचे सत्व वापरावे. लहान बाळांना चवीत बदल म्हणून देता येते. कोणीही व्यक्ती आवडीने खाईल असा हा पदार्थ आहे. 

ताकातील नाचणी सत्वाचे साहित्य 

नाचणी सत्व - १ चमचा 
गोड दही किंवा ताजे गोड ताक - २ वाट्या 
मीठ 
मिरपूड - अगदी चिमूटभर 

ताकातील नाचणी सत्वाची कृती 

  • गोड दह्यात थोडे पाणी घालून ताक करावे. 
  • ताज्या ताकात चमचाभर नाचणीचे सत्व, मीठ आणि किंचित मिरपूड घालावी. 
  • ढवळून मिश्रण सारखे करावे. 
  • बारीक गॅसवर हे मिश्रण ठेऊन सतत चमच्याने ढवळत राहावे. ३-४ मिनिटांत जसजशी नाचणी शिजेल, तसतसे मिश्रण घट्ट होत येईल. 
  • ढवळणे थांबवल्यास लगेच गुठळ्या होतात. 
  • घट्ट झाले कि ताकातील सत्व तयार झाले. 
याचीच दुसरी पद्धत म्हणजे ताकात न शिजवता, मीठ मिरपूड घालून नाचणी सत्व पाण्यात शिजवावे. घट्ट झाल्यावर वरून ताक घालावे. 
दोन्ही पद्धतीने केले तरी पटकन होते आणि चविष्ट लागते. 

Tags: Ragi malt for diabetes, nachni satva in curd buttermilk, takatil nachni satva

Related Posts:

  • नाचणीचे घावन, नाचणीचे धिरडे, Ragi Ghavan Nachni Dhirde Tags: Nachanich ghavan nachniche dhirade ragi quick dosa finger millet flat pancake अगदी झटपट आणि पौष्टिक अशी ही पाककृती आहे. नाचणीच्या धिरड्याचे साहित्य : नाचणीचे पीठ - १ वाटी  बारीक रवा - २ टेबलस्पून  दही किंव… Read More
  • नाचणी सत्व, Ragi Malt Tags: नाचणीचे सत्त्व nachniche sattva satva how to make ragi malt marathi recipe nachni che satva यात आधी नाचणीला मोड आणले जातात. त्यामुळे आधीपासून असलेले सर्व पौष्टिक घटक अजून वाढतात. आणि म्हणूनच या प्रकार… Read More
  • नाचणीची इडली, Nachni Idli Ragi Idli Tags: nachanichi idli nachni chi idlya ragi idli finger millet idlis  Ragi Idli पीठ भिजवून आंबवून त्याच्या इडल्या करता येतात किंवा सोडा घालून इन्स्टंट इडल्या करता येतात.  थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इ… Read More
  • नाचणीचे डोसे, नाचणीच्या आंबवलेल्या पिठाचे डोसे, Ragi dosa feremented flour, Nachni Dosa Tags: nachani che dose nachnicha dosa ragi recipes ragi dosa finger millet fermented crepe pith ambvun kelele dose नाचणीचे पीठ करून ते आंबवून नेहमीप्रमाणे डोसे करता येतात. लिंकवर नाचणीच्या पिठाची कृती आहे. घरी करणे शक्… Read More
  • नाचणीचे पीठ कसे करावे? How to make ragi flour Tags: how to make ragi flour powder nachniche pith peeth  नाचणीचे पीठ खाली दिलेल्या २ प्रकारे केले जाते. प्रकार पहिला - Dry Roast नाचणी चाळून नीट निवडावी. अतिशय मंद गॅसवर जाड बेसचे पातेले ठेऊन त्यात ती भाज… Read More

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

519,326

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.