Tags: nachani che dose nachnicha dosa ragi recipes ragi dosa finger millet fermented crepe pith ambvun kelele dose
नाचणीचे पीठ करून ते आंबवून नेहमीप्रमाणे डोसे करता येतात. लिंकवर नाचणीच्या पिठाची कृती आहे. घरी करणे शक्य नसल्यास विकत आणावे.
आंबवून केलेल्या डोशाप्रमाणे नाचणीचे इन्स्टंट डोसेदेखील केले जातात. पण केव्हाही थोडे आधीच ठरवून सोडा इनो न घालता केलेले डोसे उत्तमच!
१ वाटी नाचणी पीठ
१ वाटी इडली रवा
अर्धी वाटी उडीद डाळ
मीठ, पाणी
फोडणी - ऐच्छिक
१ वाटी इडली रवा
अर्धी वाटी उडीद डाळ
मीठ, पाणी
फोडणी - ऐच्छिक
नाचणीचे डोसे रेसिपी :
- सर्वात आधी इडली रवा आणि उडदाची डाळ पाण्यात वेगवेगळी भिजत ठेवावी. ६ ते ८ तास भिजवली गेली पाहिजे.
- सकाळी भिजत टाकल्यास संध्याकाळी मिक्सरमध्ये बारीक करता येईल.
- रवा, डाळ पेस्ट करण्यास सुरुवात करण्यापूर्वी नाचणीचे पीठ थोड्या पाण्यात भिजत टाकावे. भिजेल इतपतच पाणी ठेवावे.
- इडली रव्यातील जास्तीचे पाणी काढून टाकून ग्राईंडरमधून बारीक पेस्ट करावी.
- उडीद डाळीतील जास्तीचे पाणी काढून त्याचीही मऊसूत पेस्ट करावी. उडीद डाळ मिक्सरमध्ये सलग कधीच फिरवू नये. नेहमी मधे मधे थांबवत पेस्ट करावी. त्यामुळे उडदाला हलकेपणा येतो.
- इडली रव्याची आणि उडदाची पेस्ट मिक्स करून परत एकदा फिरवावे होईल.
- यात भिजवलेले नाचणीचे पीठ जास्तीचे पाणी काढून टाकून घालावे आणि परत एकदा सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. फारच घट्ट वाटत असेल तर किंचित पाणी घालावे.
- हे मिश्रण रात्रभर म्हणजे निदान १२-१४ तास झाकण लावून उबदार जागेत ठेवून द्यावे.
- थंडीच्या दिवसात उशिराने आंबते. मिश्रण फुगून वर येतं त्यामुळे पातेले उंच आणि मोठे असावे.
- असे आंबलेले, फुगून वर आलेले मिश्रण ढवळून घ्यावे. ढवळताना हवेचे छोटे छोटे बुडबुडे बाहेर येतील आणि मिश्रण फाटल्यासारखे वाटेल.
- या मिश्रणात अंदाजे पाणी आणि मीठ घालावे. इडली करतो त्यापेक्षा थोडे अधिक पाणी घालून मिश्रण पातळसर करावे. गरम तव्यावर पातळ डोसे करावे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नाचणी तांदूळ उडदाप्रमाणे एकजीव होत नाही. Standing मिश्रणात खाली तळाशी बसते. म्हणून प्रत्येक वेळेला मिश्रण खाली वर मगच डोसे करावे.
आंबवलेल्या मिश्रणात थोडी तेल+कढीपत्ता+मोहरी+हिंग अशी फोडणी घालून मग डोसे केल्यास अजून वेगळी चव येते.
नाचणीचे इन्स्टंट डोसे करण्यासाठी लिंकवर पाककृती लिहिली आहे.
नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीससाठी नाचणीचे पदार्थ इथे क्लिक करा.
नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीससाठी नाचणीचे पदार्थ इथे क्लिक करा.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.